मुंबई :सन २०१४ मध्ये मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पात समाविष्ट असलेल्या ऐरोली-काटई नाका महामार्ग प्रकल्पाच्या कामासाठी नियोजन केले गेले. ७१७ कोटी २६ लाख इतक्या खर्चाची मंजुरी देखील देण्यात आली होती. काही कारणास्तव प्रकल्प रखडल्यामुळे त्याचा खर्च आता १,४४१ कोटी ३९ लाख इतका झाला. 'एमएमआरडीए' प्राधिकरणाने गतिमान निर्णय घेतले. विस्तारित 'मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्प'च्या ३ हजार ६२८ कोटींच्या प्रकल्पास आठ वर्षांपूर्वीच निर्णय घेतला होता . मात्र मार्गी लागण्याचे काम आता सुरू झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ह्या प्रकल्पाच्या बोगद्याचे काम सुरु होत आहे. प्रकल्पाअंतर्गत पारसिक डोंगरामध्ये प्रगतीपथावर असलेल्या डाव्या बाजूच्या बोगद्याचा डे-लाईटसाठी शेवटचा ब्लास्ट केला जाईल.
शिंदे फडणवीस सरकार : हा प्रकल्प या टप्प्यात येईपर्यंत शिंदे फडणवीस सरकार आले. नवीन सरकारने अनेक पातळीवर विविध प्रकल्पासाठी धडाधड निर्णय घेतले. मंजूरी देण्याचे काम केले . आता ऐरोली-काटई नाका महामार्गाचा अंतर्भाव करण्यात आला असून भूसंपादनाच्या किंमती व्यतिरिक्त ९४४ कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली होती. नाहूर ते बदलापूर ३३.३८ किमी लांबीच्या महामार्गाच्या जाळ्यात १२.३ किमी लांबीचा ऐरोली पूल ते काटई नाका या पुलाचा समावेश आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर ही शहरे मुंबई शहराशी थेट जोडली जातील. विरार ते अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकाही जोडल्या जाऊन रहदारी सुरळीत होऊ शकणार आहे. ठाणे-बेलापूर रस्ता ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ पर्यंत ३.४३ किमी ऐरोली पूल ते ठाणे-बेलापूर रोड रस्ता २.५७ किमी आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ते काटई नाका जंक्शन ६.३० किमी या तीन टप्प्यांत कामाचे विभाजन होत आहे. ३२ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण, वन तथा पर्यावरण विभागाच्या परवानगी त्यासाठी घेण्यात आल्या आहेत.
बोगदयाचे-रस्त्याचे बांधकाम आज सुरु :ऐरोली कटाई नाका रस्ता प्रकल्प भाग-१ ठाणे बेलापूर रस्ता ते राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ च्या बोगदयाचे व रस्त्याचे बांधकाम आज सुरु होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे ऐरोली कटाई नाका रस्ता प्रकल्प विस्तारीत पायाभूत सुविधा प्रकल्पाअंतर्गत हाती घेण्यात आलेला आहे. सदर प्रकल्पाचा भाग १ मधिल बोगदयाचे व रस्त्याचे बांधकाम हे ऐरोली पुल ते ठाणे बेलापूर रस्ता पर्यंत आहे. सदर प्रकल्प कामकाजाच्या दृष्टीने खालील भार्गामध्ये विभागणी केलेली आहे.ठाणे बेलापूर रस्ता ते राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ हा ३.४३ कि.मी.इतक्या लांबीचा आहे. ऐरोली पुल ते ठाणे बेलापूर रस्ता लांबी २.५७ कि.मी.इतकी आहे .