नवी मुंबई -लग्नाचे आमिष दाखवून पनवेल राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचा कोषाध्यक्ष शहबाज फारूक पटेल याने एका तरूणीचे लैंगिक शोषण ( sexually abusing allegation on NCP Activists ) केले आहे. या प्रकरणी खारघर पोलिसांनी त्याला अटक ( Navi Mumbai Kharghar police arrest NCP activist ) केले आहे. लैंगिक शोषण व जातीवाचक शिवीगाळ असे आरोप या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर पीडीत तरूणीने लावले आहेत.
लग्नाचे आमिष दाखवून लैगिंक शोषण -
युवक राष्ट्रवादीचा पदाधिकारी असलेल्या शहबाज फारूख पटेल हा जिममध्ये जात होता संबंधीत तरूणी देखील तिथे येत होती. शहाबाजने तरूणी बरोबर मैत्री केली. या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर पीडित तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून शहाबाझने गेल्या वर्षभरात अनेक वेळा तिचे शारीरिक शोषण केले. याशिवाय गुंगीचे औषध टाकून तरुणीला पान खाण्यास दिले. तरूणी बेशुद्ध झाल्यावर तिचा अश्लिल व्हिडियो तयार केला व शहाबाझ कडून तिला वारंवार ब्लॅकमेल केले, असाही आरोप तिने केला आहे. याशिवाय पीडितेच्या पतीला धमकी देत त्याच्याकडून शहाबाझ पैसे देखील उकळत होता. अखेर याला कंटाळलेल्या पीडितेने खारघर पोलीस ठाणे गाठून गुन्हा दाखल करताच पोलिसांनी आरोपी शहबाझ पटेलला अटक केली आहे.