नवी मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट ( Offensive Post Against Uddhav Thackeray ) केल्याप्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचे पती संदीप म्हात्रे यांना अटक करण्यात आली ( Ex Corporators husband Sandeep Mhatre Arrested ) आहे. काल रात्री शिवसैनिकांनी तक्रार दाखल केली ( Shiv Sainik Complaint Against Sandeep Mhatre ) होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.
Offensive Post Against Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह लिखाण, भाजपच्या माजी नगरसेविकेच्या पतीला अटक - माजी नगरसेविका संगीत म्हात्रे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या भाजपच्या नेत्याचे प्रकरण ताजे असतानाच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधातही आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली ( Offensive Post Against Uddhav Thackeray ) आहे. याप्रकरणी शिवसैनिकांनी तक्रार दाखल केल्यानंतर ( Shiv Sainik Complaint Against Sandeep Mhatre ) पोलिसांनी भाजपच्या माजी नगरसेविका संगीता म्हात्रे यांचे पती संदीप म्हात्रे ( Ex Corporators husband Sandeep Mhatre Arrested ) यांना अटक केली आहे.
![Offensive Post Against Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह लिखाण, भाजपच्या माजी नगरसेविकेच्या पतीला अटक संदीप म्हात्रे](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14121972-1033-14121972-1641549486336.jpg)
संदीप म्हात्रे
यापूर्वीही दाखल आहेत गुन्हे
संदीप म्हात्रे हे माजी नगरसेविका संगीता म्हात्रे ( Ex Corporator Sangeeta Mhatre ) यांचे पती आहेत. यापूर्वी देखील संदीप म्हात्रे म्हात्रे यांच्यावर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल आहे. कोपर खैरणे पोलिसांनी ( KoparKhairane Police Mumbai ) कलम 154 अ अंतर्गत गुन्हा दाखल करत म्हात्रे यांना अटक केली आहे.