मुंबई : राज्यात कोरोनाचे 788 नवीन रुग्ण वाढल्याने चिंता वाढली आहे. अशातच राज्यात सकाळी 11 वाजता जे जे रुग्णालयामध्ये मॉक ड्रील करण्यात येणार आहे. तर दुपारी 12 वाजता सेंट जॉर्ज रुग्णालय व दुपारी 1 वाजता बॉम्बे रूग्णालयात मॉक ड्रील करण्यात येणार आहे. राज्यात रविवारी 788 नवीन रुग्णांची तर एका मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात 4578 अॅक्टिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत 81 लाख 49 हजार 929 एकूण रुग्णांची नोंद झाली आहे. 79 लाख 96 हजार 883 रुग्ण बरे झाले आहे. 1 लाख 48 हजार 459 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
'या' जिल्ह्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण :राज्यात 4578 अॅक्टिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामधील मुंबईत 1434, ठाणे 820, पुणे 747, नागपूर 328, रायगड 251, पालघर 120, सातारा 104, सांगलीत 110 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशव्यापी मॉक ड्रिलमध्ये सरकारी आणि खासगी दोन्ही आरोग्य केंद्रे सहभागी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आज झज्जर येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मॉक ड्रिलची पाहणी करणार आहेत.