मुंबई - विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात कविता, श्लोक आणि शरेबाजीवरून सरकार आणि विरोधकांनी एकमेकांवर टोलेबाजी केली. त्यानंतर आता कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनीही एक श्लोक ट्विटवरून शेअर करत मोदी सरकारवर टीका केली आहे.
यदा यदा ही मोदीस्य:
मंदी भवती भारतं:
अभ्यूत्थानम अंधभक्तस्य:
बेरोजगारी युगे युगे..!
यदा यदा ही मोदीस्य: मंदी भवती भारतं; श्लोकातून जयंत पाटलांचा मोदी सरकारला टोला - ncp maharastra President jayant patil
राज्याचे कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी एक श्लोक ट्विटवरून शेअर करत मोदी सरकारवर टीका केली आहे.
जयंत पाटील
तसेच, कुणीही कुणाला मारहाण करणे योग्य नाही. त्याचे समर्थनही कुणी करणार नाही. पण सोशल मीडियावर कोणत्या स्तरावर जाऊन ट्रोल करायचं, याबाबत सर्वांनी मर्यादा राखल्या पाहिजेत, असेही त्यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.