मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय नागरी उड्डान मंत्री प्रफुल्ल पटेल यांची सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी करण्यात येणार आहे. यासाठी प्रफुल्ल पटेल आज ईडीच्या मुंबईतील कार्यालयात दाखल झाले आहेत.
दाऊदशी संबंध असलेल्या इकबाल मिर्ची याची मालमत्ता विकत घेतल्याप्रकरणी ईडीकडून प्रफुल्ल पटेल यांची चौकशी करण्यात येत आहे. दक्षिण मुंबईतील बॅलार्ड पियर परिसरातील ईडीच्या कार्यालयात त्यांना पाचारण करण्यात आले आहे. वरळीतील सीजे हाऊसमधील त्यांच्या मालकीच्या दोन फ्लॅटच्या खरेदी व्यवहारबाबत त्यांच्याकडे ही चौकशी केली जाणार आहे.
हेही वाचा -'पवारांनी चंपा म्हणल्यावर राज ठाकरेंनी काहीतरी नवीन म्हणावं'
मिर्ची सोबत कोणते आर्थिक व्यवहार केलेले नाहीत, हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप पटेल यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता.
प्रफुल्ल पटेल ईडी कार्यालयात पोहचले काय आहे प्रकरण
वरळीत भागात असलेल्या ‘सीजे हाऊस’ या इमारतीची पुनर्बाधणी पटेल यांच्या कंपनीने केली होती. या इमारतीत मिर्ची याच्या पत्नीच्या नावे खोली आहे. या खोलीचा पटेल यांच्या कंपनीशी व्यवहार झाला होता. तसेच सदनिका खरेदीच्या करारावर प्रफुल्ल पटेल आणि हजरा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यातून पटेल यांना आर्थिक फायदा झाल्याचे अंमलबजावणी संचालनालयाचे म्हणणे आहे. या व्यवहाराच्या संदर्भात चौकशी करण्यासाठी पटेल यांना अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस बजावली होती.
हेही वाचा -मुख्यमंत्र्यांसारख्या दत्तक बापाची नाशिकला गरज नाही, पवारांचा निशाणा