महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अजित पवारांनी वाचून दाखवला संजय राऊतांचा 'तो' मेसेज

अजित पवारांनी संजय राऊत यांचा एसएमएस वाचून दाखवत, त्यांनी मला का मेसेज केला हे माहीत नाही, असे सांगत सस्पेन्स वाढविला आहे.

By

Published : Nov 3, 2019, 3:10 PM IST

Updated : Nov 3, 2019, 3:40 PM IST

अजित पवार

मुंबई- महायुतीमध्ये सत्तासंघर्ष सुरू असताना शिवसेना खासदार संजय राऊत भाजपवर हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘तो मी नव्हेच’ ही भूमिका घेतली आहे. आता अजित पवारांनी संजय राऊत यांचा एसएमएस वाचून दाखवत, त्यांनी मला का मेसेज केला हे माहीत नाही, असे सांगत सस्पेन्स वाढविला आहे.

अजित पवारांनी वाचून दाखवला संजय राऊतांचा 'तो' मेसेज

मेसेजमध्ये त्यांनी 'साहेब, जय महाराष्ट्र, मी संजय राऊत' असे लिहले आहे. मेसेज का केला, हे त्यांना नंतर फोन करून विचारीन, असे सांगत अजित पवारांनी मेसेज वाचून दाखवला.

शरद पवार मुख्यमंत्री होणार अशीही एक शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात होती. मात्र, शरद पवारांचा मुख्यमंत्रीपदाशी दूरान्वयेही संबंध नाही असे अजित पवार यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले.

संजय राऊत आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर, आज संजय राऊत यांनी शिवसेनेकडे १७५ आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये सांगितले होते. यासंदर्भात विचारले असता, राऊतांनी कोणता आकडा मनात पकडला आहे हे तेच स्पष्ट करतील, असे अजित पवार यांनी सांगितले.

जनतेने दिलाय विरोधी पक्षात बसण्याचा कौल..

यावेळी बोलताना पवार म्हणाले, की जनतेने महाआघाडीला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे. महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिले आहे. त्यामुळे, युतीने लवकरात लवकर सरकार स्थापन करावे. मात्र असे म्हणतानाच, शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस अशा युतीबाबत पक्षांचे नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असेही ते म्हटले आहेत.

संजय राऊतांचा मेसेज..

संजय राऊतांशी माझी यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही, मात्र आज त्यांचा मेसेज मला आला आहे. तो मेसेज याच चर्चेसाठी आहे का, हे मला माहित नाही. कदाचित वेगळ्या काही कामासाठीदेखील त्यांनी मेसेज केला असावा असे पवार यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा -आमचे सरकार आल्यावर सातबारा कोरा करू - उद्धव ठाकरे

शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठीच्या अंतिम निर्णयापर्यंत उद्धव ठाकरे पोहचले आहेत. सेनेच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी शिवतीर्थावर होणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी करतभाजपसोबतच्या चर्चेत शिवसेनेकडून कोणतीही अडचण नाही. मात्र खोटं बोलणारी, टोपी फिरवणारी मंडळीच चर्चेतला प्रमुख अडथळा आहेत, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपचा समाचार घेतला.

भाजपने सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला असून भाजपचे राजकारण हे गुंडांच्या टोळ्यांपेक्षाही घाणेरडे आहे. सरकारी यंत्रणांचा गैरवापर कसा करण्यात आला, यासंबंधीची माहिती आपल्याकडे आली असून याचा आपण लवकरच पर्दाफाश करणार आहोत, असेही राऊत म्हणाले. कर्नाटकात झालेलं ‘ऑपरेशन कमळ’ महाराष्ट्रात चालणार नसल्याचा इशाराही राऊत यांनी दिला.

Last Updated : Nov 3, 2019, 3:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details