मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना (Nawab Malik getting bail ) वैद्यकीय कारणास्तव दोन महिन्याचा जामीन (Nawab Malik getting bail ) मिळाल्यानंतर सोमवारी आपल्या घरी पोहचले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले होते. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, (Ajit Pawar group state president Sunil Tatkare) राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल (Ational working president Praful Patel) यांनी नवाब मलिक यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून, सदिच्छा भेट असल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी भेटीनंतर दिली.
राजकीय चर्चा नाही : मनी लाँड्रिंग प्रकरणी नवाब मलिक गेल्या दीड वर्षापासून तुरुंगात होते. वैद्यकीय कारणास्तव जामीन मिळाल्यानंतर सोमवारी मलिक आपल्या घरी पोहोचले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मिरवणुकीत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. मलिक राष्ट्रवादीच्या कोणत्या गटाकडे जाणार याकडे आता सगळ्यांच्या नजरा आहेत. यातच मंगळवारी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि प्रफुल्ल पटेल यांनी नवाब मलिक यांची घरी जाऊन भेट घेतली. गेल्या 25-30 वर्षापासून आम्ही सोबत काम केले आहे. मलिकांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आम्ही आलो होतो. आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती पटेल यांनी दिली.