मुंबई : जर तुम्हाला केक खाण्याची आवड असेल तर तुम्हीही नॅशनल केक डे साजरा ( National Cake Day) करू शकता. असे मानले जाते की केक प्रथम प्राचीन ग्रीस आणि इजिप्तमध्ये बनवला गेला होता. केक बनवण्याचे बरेच मार्ग आहेत. फळे आणि ड्रायफ्रुट्सच्या मदतीने केकची चव खास बनवली जाते. त्यामुळे जर तुम्हाला घरच्या घरी स्वादिष्ट केक बनवायचा असेल तर या केकच्या रेसिपी ( Cake Recipe ) पहून घ्या.
केक बनवण्यासाठी साहित्य आणि कृती :1 वाटी मैदा, 2 कच्ची अंडी, 5 चमचे साखर, 2 चमचे मलई, 1 टीस्पून बेकिंग पावडर, वेलिना ईसेंस, बेकिंग सोडा. सर्व प्रथम, एका भांड्यात मैदा, साखर आणि बेकिंग पावडर घ्या, चांगले मिसळा, त्यात अंडे घाला. हे मिश्रण चांगले फेटून घ्या. आता केकच्या साच्यात घालून मायक्रोवेव्हमध्ये 20-25 मिनीटे बेक करण्यासाठी ( cake making Ingredients ) ठेवा.
कॅरट विथ क्रीम चीज केक : कॅरट केक ही सर्वात सामान्य केक रेसिपीपैकी एक ( Carrot with cream cheese cake ) आहे. जे बहुतेकदा इस्टरच्या निमित्ताने बनवले जाते. जर तुम्ही केक बेक करण्याचा विचार करत असाल तर केक बेक करून घ्या त्याच्या वरच्या थरावर चीज टाकून त्यावर गाजरने गार्निश करा अशा प्रकारे तुमचा कॅरट विथ क्रीम चीज केक तयार होईल.