महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई आयआयटी टेकफेस्टमध्ये नाशिकची 'एअर टॅक्सी'

आयआयटी मुंबईत ३ जानेवारी पासून सुरू झालेल्या टेकफेस्टमध्ये तंत्रज्ञान प्रदर्शनात देश-विदेशातील तंत्रप्रेमी विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या टेकफेस्टमध्ये नाशिकच्या एअर टॅक्सी ही चर्चेचा विषय आहे.

mumbai
मुंबई आयआयटी टेकफेस्टमध्ये नाशिकची 'एअर टॅक्सी'

By

Published : Jan 5, 2020, 7:55 AM IST

मुंबई - दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून नाशिकच्या ऐरोहंस कंपनीने भारतीय बनावटीची एअर टॅक्सी बनवली आहे. विमानाप्रमाणे हवेतून उडणारी ही टॅक्सी असून यासाठी आवश्यक चाचण्या सध्या सुरू आहेत. येत्या दोन ते तीन वर्षात ही टॅक्सी सामान्य नागरिकांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. ही टॅक्सी मुंबई आयआयटी टेकफेस्टच्या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहे.

मुंबई आयआयटी टेकफेस्टमध्ये नाशिकची 'एअर टॅक्सी'

हेही वाचा -थंडी वाढताच नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात भरला पक्ष्यांचा मेळा, पक्षीप्रेमींसाठी पर्वणी

आयआयटी मुंबईत ३ जानेवारी पासून सुरू झालेल्या टेकफेस्टमध्ये तंत्रज्ञान प्रदर्शनात देश-विदेशातील तंत्रप्रेमी विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या टेकफेस्टमध्ये नाशिकच्या एअर टॅक्सी ही चर्चेचा विषय आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे रस्त्यावर वाहतूककोंडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यावर पर्याय म्हणून या एअर टॅक्सीची निर्मिती करण्यात आली असून ही टॅक्सी बॅटरीवर चालणारी असून इंधनाची गरज लागणार नाही.

हेही वाचा -कादवा सहकारी साखर कारखान्याचे विक्रमी गाळप; सभासदांनी केला अध्यक्षांचा सत्कार

चार आसन क्षमता असलेल्या या टॅक्सीचा वेग ताशी १२० किमी इतका आहे. त्यामुळे वेळेची बचत होणार असल्याचे तंत्रज्ञ सर्वेश चिनागी यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details