मुंबई -विधानसभा उपाध्यक्षपदी नरहरी झिरवळ यांची बिनविरोध निवड झाली आहे. अनेक वर्षाच्या नरहरी यांच्या मेहनतीला आणि आदिवासी प्रतिनिधीला यावर्षी उपाध्यक्षपदाचा मान मिळाला. या निमित्ताने मुंबईत विधान भवनाबाहेर आदिवासी बांधवांनी आपल्या भागातील पारंपारिक संस्कृती असलेले नृत्य सादर करत आनंद साजरा केला.
विधानसभा उपाध्यक्षपदी नरहरी झिरवळ यांची बिनविरोध निवड, आदिवासी बांधवाचा जल्लोष - विधानसभा उपाध्यक्षपदी नरहरी झिरवळ
आदिवासी बांधव त्यांची कला सादर करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री टोपे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आदी आमदार यावेळी उपस्थित होते.
विधानसभा उपाध्यक्षपदी नरहरी झिरवळ यांची बिनविरोध निवड, आदिवासी बांधवाचा जल्लोष
आदिवासी बांधव त्यांची कला सादर करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री टोपे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आदी आमदार यावेळी उपस्थित होते.
आदिवासी बांधवाचे हे नृत्य कशाप्रकारचे असते तसेच ही परंपरा काय असते, याबबात ईटीव्ही भारतच्या प्रतिनीधीने आदिवासी बांधवाशी संवाद साधला.