मुंबई- कोरोना व्हायरसच्या विरोधात सर्व भारतीय एकजुटीने लढा देत असल्याचे दाखवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला दिवे लावण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला जनतेने प्रतिसाद दिला आहे. मोदींनी जनतेला 5 एप्रिलला रात्री 9 वाजता मेणबत्ती, टॉर्च किंवा दिवा लावण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार राज्यातील जनतेने आज दिवे लावत पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला राज्यात संमिश्र प्रतिसाद, महाराष्ट्र दिव्यांनी उजळला - सोलापूरात फटाक्यांची आतषबाजी
पंतप्रधान मोदी यांनी जनतेला 5 एप्रिलला रात्री 9 वाजता मेणबत्ती, टॉर्च किंवा दिवा लावण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार राज्यातील जनतेने आज दिवे लावत पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.
मुंबईचे सिद्धिविनायक मंदिर उजळले दिव्यांनी
Live Updates -
- मुंबईचे सिद्धिविनायक मंदिर उजळले दिव्यांनी -
- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लावले दिवे -
- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लावले दिवे -
- गोपीनाथ गड दिव्यांनी उजळला -
- धारावीमध्ये नागरिकांनी लावले दिवे -
- मुलुंडमधील नागरिकांनी लावले दिवे -
- सोलापूरात फटाक्यांची आतषबाजी -
- केंदीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील लावले दिवे -
Last Updated : Apr 5, 2020, 10:05 PM IST