मुंबईNarendra Dabholkar Case :अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं महाराष्ट्रात आणि देशात केलं जात होतं. त्या संदर्भात राज्यभरात विविध ठिकाणी व्याख्याने देणं आणि जनजागरण करणं हे काम डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वात केलं जात होतं. (Mukta Dabholkar) वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या त्यांच्या मुद्द्यांना काही कट्टर धार्मिक लोकांनी विरोध केला होता. ऑगस्ट 2014 या काळामध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना पुणे येथे गोळ्या झाडून मारण्यात आलं. हे आरोपी 'सनातन' या संस्थेचे असल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. (Sanatan Sanstha)
प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान :डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणाच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये खटला दाखल झाला होता. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने यापुढे या प्रकरणात न्यायालयाच्या देखरेखीची गरज नाही, असा निर्णय दिला होता. फेब्रुवारी 2023 मध्ये हा निर्णय जाहीर केला होता. त्या निर्णयाच्या विरोधात मुक्ता दाभोलकर विरुद्ध सीबीआय या खटल्यात सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.
यामुळे सर्वोच्च न्यायालयात जावं लागलं :डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची कन्या मुक्ता दाभोळकर यांनी सीबीआयच्या विरोधात सीबीआय योग्य रीतीने जलद गतीने तपास करत नाही. त्यासाठी न्यायालयाच्या देखरेखीखाली संपूर्ण तपास केला जावा, अशी मागणी केली होती. तर याबाबत मुख्य आरोपी वीरेंद्र सिंह तावडे याने त्याला विरोध देखील केला होता की, 2015 पासून न्यायालयाच्या देखरेखीखाली हा तपास सुरू आहे. खंडपीठाने फेब्रुवारी 2023 मध्ये आता न्यायालयाच्या देखरेखीखाली तपासाची गरज नाही, असं म्हटलं होतं. त्यालाच सर्वोच्च न्यायालयात मुक्ता दाभोलकर यांच्याकडून आव्हान देण्यात आलं होतं. मुक्ता दाभोलकर यांच्या वतीने ज्येष्ठ वकील आनंदगृहावर यांनी बाजू मांडली की, अत्यंत गंभीर खून खटला आहे. याचा विविध अंगाने तपास होणे गरजेचे आहे. तो तपास करण्याच्या आधीच उच्च न्यायालयाने ते निरीक्षण करण्याचं स्थगित केलं. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयात यावे लागले.