मुंबई- सुशांतसिंह राजपूत याची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिचे ड्रग्सडीलरसह संबंध असल्याचे व्हाट्सअॅप चॅट समोर आल्यानंतर या संदर्भात ईडीकडून रिकव्हर केलेले व्हाट्सअॅप चॅट हे सीबीआय व नार्कोटिक्स नियंत्रण ब्युरोला देण्यात आलेले आहेत. त्यानुसार या संबंधात तपास सुरू करण्यात आला असून नार्कोटिक्स नियंत्रण खात्याकडून गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. या संदर्भात तपास करण्यासाठी दिल्लीतील नार्कोटिक्स नियंत्रण ब्युरोचे दोन पथक रवाना झाली होती. त्यातील एक पथक गोव्यात गौरव आर्या याचा शोध घेण्यासाठी दाखल झाले असून दुसरे पथक गुरुवारी (27 ऑगस्ट) मुंबईत दाखल झाले आहे.
सुशांत प्रकरण : दिल्लीतून नार्कोटिक्स नियंत्रण पथक मुंबईत दाखल - Mumbai news
सुशांतसिंह राजपूत याची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिचे ड्रग्ज डीलरसह संबंध असल्याचे व्हाट्सअॅप चॅट समोर आल्यानंतर यासंदर्भात ईडीकडून रिकव्हर केलेले व्हाट्सअॅप चॅट हे सीबीआय व नार्कोटिक्स नियंत्रण ब्युरोला देण्यात आलेले आहेत. त्यानुसार याबाबत तपास सुरू करण्यात आला असून दिल्लीतून नार्कोटिक्स नियंत्रण विभागाचे पथक मुंबईत दाखल झाले आहेत.
नार्कोटिक्स नियंत्रण ब्युरोकडून कलम 20 ब, 28, 29 नार्कोटिक्स नियंत्रण कायद्याअंतर्गत रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, जया शहा, श्रुती मोदी व गौरव आर्या यांच्याविरोधात हा गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नार्कोटिक्स नियंत्रण ब्युरोचे एक पथक गोव्यात दाखल झाले असून याठिकाणी गौरव आर्या याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता गौरव आर्या हा गोव्यातून बेपत्ता झाल्याचेही एनसीबी सूत्रांकडून कळत आहे. दरम्यान, 16 ऑगस्टला गोव्यात एका रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात अमली पदार्थांचा पुरवठा हा गौरव आर्या यांनी केल्याचे समोर आलेले आहे.
हेही वाचा -रियाचे वडील इंद्रजित चक्रवर्ती यांना पोलीस ईडी कार्यालयात घेऊन गेले