मुंबई -केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Narayan Rane Submits Affidavit ) यांनी आपल्या जुहू तारा रोड येथील अधीश बंगल्यात बेकायदेशीर बांधकाम ( Illegal Construction Demolished From Bungalow ) केले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर राणे यांनी स्वतःच हे बांधकाम पाडले आहे. तसे प्रतिज्ञापत्र राणे यांच्या वकिलाने महापालिकेला सादर केले आहे. महापालिका ( Mumbai Municipal Corporation ) हे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करणार असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली.
नारायण राणेंच्या बंगल्यात बेकायदेशीर बांधकाममुंबईमध्ये जुहू येथील तारा रोडवर केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Union Minister Narayan Rane Bungalow ) यांचा अधिश हा बंगला आहे. या बंगल्यामध्ये महापालिकेच्या कोणत्याही परवानग्या न घेता अनेक फेरबदल करण्यात आले होते. महापालिकेकडे आलेल्या तक्रारीनंतर या बंगल्याची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकाम केल्याचे निदर्शनास आले होते. याप्रकरणी महापालिकेने नारायण राणे यांना नोटीस दिली होती.
नारायण राणेंनी बांधकाम तोडलेनारायण राणे ( Narayan Rane Illegal Construction ) यांनी त्याला कोर्टात आव्हान दिले असता महापालिकेकडे बांधकाम नियमित करण्यासाठी अर्ज करण्याच्या सूचना राणे यांना कोर्टाने केल्या होत्या. महापालिकेने हे बेकायदेशीर बांधकाम असल्याने नियमित करण्यासाठीचा अर्ज फेटाळून लावला. राणे पुन्हा कोर्टात गेले. कोर्टाने तीन महिन्यात बेकायदेशीर बांधकाम पाडावे असे आदेश राणे यांना दिले. राणे यांनी बांधकाम तोडले नाही, तर महापालिकेने ते बांधकाम तोडावे, असेही आदेश कोर्टाने दिले होते. त्यामुळे राणे यांनी आपल्या बंगल्यातील बेकायदेशीर बांधकाम तोडले आहे.
प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर करणारनारायण राणे यांच्या बंगल्यातील बेकायदेशीर बांधकाम तोडण्याचे काम पूर्ण झाल्यावर त्यांनी एक प्रतिज्ञापत्र महापालिकेला सादर केले आहे. हे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर करायचे आहे. माहपालिकेला देण्यात आलेले प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.