मुंबई :मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच अभिनंदन करतो. याबाबत मी सकाळीच ट्विट केले होते, की शिंदे - फडणवीस सरकार राहणार. त्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने १६ अपात्र आमदार संदर्भात विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे.
Narayan Rane On Uddhav Thackeray : ...म्हणून उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद गेले; नारायण राणेंनी डिवचले - नारायण राणे
राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज निर्णय दिल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्याच बरोबर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
उध्दव ठाकरे पूर्णपणे संपलेला मनुष्य :उद्धव ठाकरे यांच्या बाबत विचारले असता नारायण राणे म्हणाले की, जर तर ला मी उत्तर देत नाही. उध्दव ठाकरे हा पूर्णपणे संपलेला मनुष्य आहे. त्याच्यावर बोलण्यासाठी त्यांनी एक माणूस ठेवला आहे, तोच त्याविषयी बोलेल असे सांगत, संजय राऊत यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला आहे. तसेच उद्धव ठाकरे हा विषयचा आता संपलेला आहे.
- वतःचे अज्ञान असल्याकारणाने हे सर्व झाले आहे. उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद अज्ञानातूनच गेले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री आहेत, तेच मुख्यमंत्री राहतील - नारायण राणे
फरफटत जाण्याशिवाय पर्याय नाही :शरद पवारांनी सुद्धा त्यांच्या आत्मचरित्राच्या पुस्तकात उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर टीका केली आहे. त्यांनी त्यांची पात्रताच काढली आहे. म्हणून आता हा विषय राहत नसून कोणाच्या तरी मागे फरफटत जाण्याशिवाय उद्धव ठाकरे यांना पर्याय नसल्याच नारायण राणे यांनी सांगितल आहे. तसेच शिंदे - फडणवीस सरकार जोमाने काम करत आहे. हा जोम काही लोकांना पचत नाही आहे. शिंदे जेव्हा उद्धव ठाकरे यांचे सर्व व्यवहार बघत होते, तेव्हा ते चांगले होते. आता ते त्यांच्यापासून दुरावले आहेत तर वाईट आहेत. तसेच हे सरकार टिकल्याने शिंदे फडणवीस सरकारला जनतेची कामे अधिक जोमाने करता येतील. जनतेचा विश्वास संपादन करता येईल. असेही नारायण राणे म्हणाले.
- Maharashtra Political Crisis : सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांसह निवडणूक आयोगाला फटकारले, शिंदे-फडणवीस सरकार वाचले!
- SC on Governor Floor Test Call : राज्यपालांचा फ्लोअर टेस्ट बोलावण्याचा निर्णय अवैध; सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
- Cabinet expansion : सुप्रीम निरीक्षणानंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा, बच्चू कडू संजय शिरसाटांसह इतरांच्या आशा पल्लवीत