Video : मी कोणताही गुन्हा केलेला नाही; मी मंत्री, सामान्य माणून नव्हे - नारायण राणे - नारायण राणे रायगड
रायगड - 'देशाचा अमृतमहोत्सव मुख्यमंत्र्यांना माहिती नसणे हा गुन्हा आहे. देशद्रोह आहे. मुख्यमंत्र्यांकडून देशाचा अपमान झाला आहे. कायदा आणि वकिली समजून घ्या. मी तिथं असतो तर असं म्हटलंय. असतो तरला गुन्हा होत नाही. मी मारतो, असे म्हटले तर गुन्हा होतो. मी कोणताही गुन्हा केला नाही. मी केंद्रीय मंत्री आहे. सामान्य माणूस नाही. नारायण राणेंनी शिवसेना सोडली तेव्हाच शिवसेना गेली. शिवसैनिकांनी भाजप कार्यालयावर दगड मारणे म्हणजे पुरूषार्थ नव्हे. उद्धव ठाकरे चिथावणीखोर बोलतात, तेव्हा गुन्हा होत नाही का? मी शिवसेनेला भिक घालत नाही. आमचंही दिल्लीत सरकार आहे. राज्याची उडी कितपत जाते ते पाहूया. जनआशीर्वाद यात्रा ठरल्याप्रमाणे होणार आहे. मी कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवणार नाही. माझ्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे माहिती नाही. पोलीस आयुक्तांच्या लेटरला मी खात नाही. नाशिकच्या पोलिसांनी कोणताही आदेश काढू दे. ते काय राष्ट्रपती आहेत का? यासाठी मी समर्थ आहे', असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल खालच्या थराला जाऊन वक्तव्य केलं. यानंतर शिवसैनिकांच्या तक्रारीवरून राणेंविरोधात पुणे, औरंगाबाद, नाशिक, महाड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर राणेंनी माध्यमांशी ही माहिती दिली.