महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'वाघाची भाषा करणारा मुख्यमंत्री हा शेळपट माणूस' - नारायण राणे - Narayan Rane Live Page

नारायण राणे
नारायण राणे

By

Published : Oct 26, 2020, 4:13 PM IST

Updated : Oct 26, 2020, 4:33 PM IST

16:31 October 26

स्वतःला वाघ म्हणवणाऱ्या उद्धव ठाकरेंनी कुणाच्या कानाखाली तरी दिली आहे का?, असा सवाल राणे यांनी केला.

16:31 October 26

सुशांतप्रकरणी स्वतःच्या मुलाला क्लिनचीट दिली. मात्र सुशांतने आत्महत्या केलेली नाही. सुशांतचा खूनच झाला आहे, असे राणे म्हणाले.

16:27 October 26

पुढच्या वेळी फक्त 10 ते 15 आमदार येतील. 55 आमदार हे फक्त मोदींमुळेच आले. 25 वर्षं सत्तेत राहण्याचे स्वप्न पाहत आहेत, असे राणे म्हणाले.

16:27 October 26

पंतप्रधानांवर टीका करायची नाही. शिवसेनेचे कार्यकर्तेही तुम्हाला मुख्यमंत्री मानत नाहीत. हे खेळण्यातील मुख्यमंत्री आहेत, असे राणे म्हणाले.

16:20 October 26

अभ्यास करा आणि मराठ्यांना आरक्षण द्या. पिजऱ्यात बसून अभ्यास होत नाही. घराबाहेर पडा, असे नारायण राणे म्हणाले.

16:19 October 26

थापेबाज मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला आहे - नारायण राणे

16:18 October 26

मराठ्यांना आरक्षण देऊन दाखवा. मुख्यमंत्र्यांना घटना माहिती नाही. त्यांनी बेईमानी करून मुख्यमंत्रीपद मिळवले आहे, असे नारायण राणे म्हणाले.

16:18 October 26

गेल्या 39 वर्षांत सेनेत अनेक केसेस आम्ही अंगावर घेतल्या, तुम्ही काय केले. मातोश्रीच्या आतल्या गोष्टी आम्ही बाहेर काढल्या तर कपडे घेऊन पळायची वेळ येईल , असे राणे म्हणाले.

16:18 October 26

शेण आणि गोमूत्रांची भाषा तोंडी शोभत नाही. तुम्हाला जीडीपी कळतो का, तुम्हाला काहीच येत नाहीत. महाराष्ट्राच्या प्रगत राष्ट्राला मंद मुख्यमंत्री लाभलाय - नारायण राणे

16:14 October 26

शिवसैनिकांनी शिवसेना उभी केली - नारायण राणे

16:14 October 26

घरात बसून मुख्यमंत्रीपद चालवता येत नाही - नारायण राणे

16:14 October 26

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामाचा उल्लेख नाही - नारायण राणे

16:13 October 26

कुणाला बेडूक म्हणताय? - नारायण राणे

16:11 October 26

उद्धव ठाकरे पुळचट मुख्यमंत्री आहेत. बाळासाहेबांना छळलं आहे त्यांनी - नारायण राणे

16:11 October 26

पिंजऱ्यामधील वाघ की, बाहेरचा वाघ आहेत? असा सवाल नारायण राणेंनी केला.

16:11 October 26

घरात बसून मुख्यमंत्रीपद चालवतात.

16:04 October 26

Narayan Rane Live Page

मुंबई -भाजप खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधली आहे. त्यांचे शिवसेना दसरा मेळाव्याचे भाषण हे ताळमेळ नसलेले होते, असे ते म्हणाले. तसेच पंतप्रधानाबद्दल बोलण्याची त्यांची लायकी नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाच्या लायकीचे नाहीत, असे ते म्हणाले. 

Last Updated : Oct 26, 2020, 4:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details