मुंबई -केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. यामळे आता शिवसैनिक संतप्त झाले आहेत. दादर टीटी भागात स्थानिक नगरसेवक अमेय घोले यांनी नारायण राणे यांचे मोठे बॅनर लावले आहेत. त्यावर "कोंबडी चोर!!!" असे राणेंना झोंबणारे शब्द लिहिले आहेत. दरम्यान, आता मुंबईसह राज्यभरात राणेंविरोधात वातावरण तणावपूर्ण पाहायला मिळत आहे. याचे पडसाद आणखी तीव्र उमटण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
राणेंवर गुन्हा दाखल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर राणे यांनी टीका केली. याप्रकरणी नाशिकच्या सायबर पोलिसांनी शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीहून गुन्हा दाखल केला. तसेच, औरंगाबाद, रायगडमध्येही राणेंविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.