महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नारायण राणेंना अनिल परबांच्या दबावामुळे अटक? व्हिडिओ व्हायरल - नारायण राणेंना अनिल परबांच्या दबावामुळे अटक

नारायण राणेंवरील अटकेच्या कारवाईनंतर शिवसेनेची डोकेदुखी वाढणार आहे. कारण, काल राणेंना राजकीय दबावापोटी अटक करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबतचा व्हिडिओही समोर आला आहे. हा व्हिडिओ आहे अनिल परब यांचा. ते अटक करण्याासाठी पोलिसांवर दबाव टाकत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

अनिल परब
अनिल परब

By

Published : Aug 25, 2021, 12:33 PM IST

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर काल दिवसभर महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंतचे राजकीय वातावरण तापल्याचे दिसले. मात्र आता या अटकेमागे राजकीय षडयंत्र असल्याचा चर्चा सुरू झाली आहे. कारण, परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. परब यात अटकेचे आदेश देत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ही अटक कोणाच्या सांगण्यावरून झाली? याबाबतची चर्चा आता जोर धरू लागली आहे.

अनिल परब

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राज्यभर राडा झाला. शिवसेना-भाजप कार्यकर्ते रस्त्यावर आपापसात भिडले. पोलिसांनी त्यानंतर नारायण राणे यांना अटक केल्याने राज्यात रणकंदन माजले. महाड सत्र न्यायालयाने रात्री उशिरा नारायण राणे यांना जामीन दिला. या जामिनानंतर पडद्यामागच्या घडामोडी समोर येत आहेत.

व्हिडिओत नक्की काय म्हटलंय?

नारायण राणेंच्या अटकेसाठी परिवहन मंत्री अनिल परब हे पोलिसांच्या संपर्कात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. 'हॅलो, काय करताय तुम्ही लोकं, तुम्हाला करावं लागेल. तुम्ही घेताय की नाही ताब्यात?' असे परब फोनवर बोलत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. राज्यभरात हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे राणेंच्या अटकेमागे राजकीय दबाव असल्याचे सूर उमटू लागले आहेत.

शिवसेनेची डोकेदुखी वाढणार?

राणे यांच्या अटकेमागे राजकीय दबाव असल्याचा आरोप करण्यात येत आहे. अटकेवेळी रत्नागिरी पोलीस अधीक्षक यांनी स्वत: आपल्यावर मोठा राजकीय दबाव असल्याचं सांगितलं, असं रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी माध्यमांना सांगितलं. त्यानंतर परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांचा एक फोनवरील संवाद साधतानाचा व्हिडिओही समोर आला आहे. त्यात ते पोलिसांना बळाचा वापर करण्याची सूचना देताना दिसत आहेत. अनिल परबांच्या या व्हिडिओवरुन आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे. आता यावरून राजकारण तापणार आहे. त्यामुळे शिवसेनेची चांगलीच डोकेदुखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा -शिवसेनेचीची आहे नारायण राणेंची भाषा, महाविकास आघाडीच्या लोकांनी मारत बसा माशा - रामदास आठवले

ABOUT THE AUTHOR

...view details