मुंबई- वरळी आणि कफपरेड कोळीवाड्यात नारळी पौर्णिमा पारंपरिक पद्धतीने थाटात साजरी केली गेली. या सणाची तयारी महिनाभर आधी करण्यात येते. प्रत्येक कोळी बांधव या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. मात्र, यावेळी सामाजिक भान राखत कोळी बांधवानी पूरग्रस्तांचा विस्कटलेला संसार पुन्हा उभा राहू दे, असे नारळी पौर्णिमेला मच्छिमारांनी सागराला साकडे घातले.
सन आयलाय गो नारली पुनवेचा, मुंबईत नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी - मुंबई
वरळी आणि कफपरेड कोळीवाड्यात नारळी पौर्णिमा पारंपरिक पद्धतीने थाटात साजरी केली गेली.
नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने काल (बुधवार) वरळी कोळीवाड्यात कोळी बांधवांनी सागराला सोन्याचा वर्ख लावलेला नारळ अर्पण केला. यावेळी कोल्हापूर, सातारा, सांगलीत जी भीषण पूरस्थिती निर्माण झाली त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात आली.
नऊपाटील जमात, गावकरी इस्टेट कमिटी च्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही वरळी कोळीवाडा येथून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी होड्यांना सजविण्यात आले होते. तर कोळी महिलांनी पारंपारिक पेहरावात सजून वाजत गाजत कोळी नृत्यावर मिरवणूक काढत वरळीच्या सागरी किनाऱ्यावर नारळ फोडून मच्छिमारांनी सागराची पूजा केली.