महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'नाणार' रायगडला जाणार.. स्थानिकांचा विरोध नाही; मुख्यमंत्र्यांचे लेखी उत्तर

रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, रोहा आणि श्रीवर्धन चार तालुक्यातील ४० गावातील सुमारे १३ हजार ४०९ हेक्टर जमिनीवर एकात्मिक औद्योगिक वसाहत विकसित करण्याचा सिडकोचा मानस आहे. तसेच सिडकोच्या प्रस्तावानुसार या भागाला औद्योगिक विकासासाठी नवनगर क्षेत्र म्हणून सिडकोची नवनगर विकास प्राधिकरण म्हणून नेमणूक करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यानी लेखी उत्तरात नमूद केले आहे.

नाणार प्रकल्प

By

Published : Jun 19, 2019, 4:45 PM IST

मुंबई - नाणार प्रकल्प विरोधी संघर्ष समिती आणि शिवसेनेच्या रेट्यामुळे नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडाला हलवण्याचा हालचाली वाढल्या आहेत. रायगड जिल्ह्यात या प्रकल्पाला संस्थानिकांच्या विरोध नसल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे.

तेलशुद्धीकरण प्रकल्पाला प्रस्तावित ठिकाणी अर्थात रायगडमध्ये स्थानिकांचा विरोध आहे का? असा प्रश्न काँग्रेसचे आमदार नसीम खान यांनी तारांकित प्रश्नात विचारला होता. याप्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, रोहा आणि श्रीवर्धन चार तालुक्यातील ४० गावातील सुमारे १३ हजार ४०९ हेक्टर जमिनीवर एकात्मिक औद्योगिक वसाहत विकसित करण्याचा सिडकोचा मानस आहे. तसेच सिडकोच्या प्रस्तावानुसार या भागाला औद्योगिक विकासासाठी नवनगर क्षेत्र म्हणून सिडकोची नवनगर विकास प्राधिकरण म्हणून नेमणूक करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यानी लेखी उत्तरात नमूद केले आहे.

या विकास प्राधिकरणांतर्गत अधिसूचित जामिनीच्या भूसंपादनच्या अनुषंगाने भूमी अभिलेख जिल्हाधिकारी रायगड यांच्या कार्यालयाकडून सिडकोने कागदपत्रे मागवण्यात आली होती. यात ४० गावातल्या ग्रामस्थांनी औद्योगिक प्रकल्पाला विरोध केल्याची बाब निदर्शनाला आली नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तरात सांगितले आहे. दरम्यान, मार्च अर्थसंकल्पीय अधिवेशनात तेलशुद्धीकरण प्रकल्पासाठी नाणारमध्ये अधिग्रहीत करण्यात आलेल्या जमिनीचे भूसंपादन रद्द करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details