मुंबई :राज्यात महाविकास आघाडीला पोषक वातावरण आहे. दोन दिवसीय लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे. स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली जात आहेत. दोन दिवसीय लोकसभा मतदार सभा संपल्यानंतर राज्यातील सर्व जिल्ह्यांचा दौरा करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
भाजपाला पराभूत करणाऱ्याला उमेदवारी :सभेत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता, निवडणुका आल्या की निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी पक्ष सज्ज झाला आहे. यासंदर्भात आढावा बैठकीत स्थानिक नेत्यांकडून माहिती घेतली जात आहे. विदर्भाप्रमाणे राज्यातही काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. आजच्या सभेत भाजपला पराभूत उमेदवार द्यावा, असे कार्यकर्त्यांमधून ऐकू आले. भाजपचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीने एकच उमेदवार द्यावा. हुकूमशाहीच्या माध्यमातून लोक मनमानी आणि जुलमी सरकारला कंटाळले आहेत. यावेळी दिल्लीसह राज्याचे चित्र बदललेले असेल.
महाविकास आघाडीत बिघाडी करण्याचा प्रयत्न :काही जणांचा महाविकास आघाडी बिघाडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मतदारसंघनिहाय आढाव बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या चर्चा करून जागा वाटपावर निर्णय होईल असे पटोले म्हणाले आहेत. भाजप सरकारने जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्ती केली नाही. त्यामुळे आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार आहोत असे माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.