मुंबई- नागपूरचे ज्येष्ठ वकील सतीश उके यांच्यावर ईडीकडून धाडी टाकण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात बोलणाऱ्या वकिलांनाही अडकविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. त्यामुळे याची गंभीर दखल घत उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने सुमोटो काढावा आणि देशातील लोकशाही वाचावी, अशी विनंती नाना पटोले यांनी न्यायालयांना केली आहे. ते निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते.
ईडीच्या वकील सतीश उके यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईचा ( ED raids on Adv Satish Uke home ) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटील ( Congress state president Nana Patil ) यांच्याकडून निषेध करण्यात आला आहे. केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून विरोधकांना त्रास दिला ( opposition parties harassment by ED ) जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. पुढे आमच्यावरही असे खोटे गुन्हे दाखल होऊ शकतात, अशी शंका नाना पटोले यांनी व्यक्त केली. ईडी तपास यंत्रणेच्या माध्यमातून पैशांचा झालेला घोटाळा बाहेर काढण्यासाठी या कायद्याची निर्मिती करण्यात आली. भाजपच्या एका खासदाराचा घोटाळा उघड झाल्यानंतर ईडीची स्थापना करण्यात आली होती. मात्र आता ईडीच्या माध्यमातून विरोधकांनाच दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप नानांनी यावेळी केला.
माझ्यावरही कारवाई होऊ शकते-ज्येष्ठ वकील सतीश उके यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालय याचिका दाखल केली होती. ती याचिका उच्च न्यायालयाने मान्य केली. यासोबतच अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सतिष उके यांनी याचिका दाखल केल्या होत्या. त्याबाबतची कागदपत्रे घेऊन जाण्यासाठी ईडीने कारवाई केली का, अशी शंका नाना पटोले यांनी उपस्थित केली. भाजपच्या विरोधात कोणी बोलेल त्याचे तोंड दाबण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे.
अनिल देशमुख आणि परमबीर सिंग यांना वेगळा न्याय कसा? 2014 नंतर देशात अघोषित आणीबाणीसारखी परिस्थिती असल्याचा आरोप नाना पटोले यांनी यावेळी केला. सतिष उके यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर पुढचा नंबर नाना पटोले यांचा असू शकतो, असा संशय संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. नाना पटोले यांनीदेखील त्या संशयाला दुजोरा दिला आहे. ईडीच्या कारवाईला सामोरे जाण्यासाठी आपण समर्थ आहोत, असा इशाराही नानांनी यावेळी दिला. केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून खोटे गुन्हे दाखल केले जातात. भविष्यात आमच्यावरही खोटे गुन्हे दाखल केले जातील. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना वेगळा न्याय कसा दिला जाऊ शकतो, असा प्रश्नही नाना पटोले यांनी उपस्थित केला.
चर्चा करण्यासाठी आमदार सोनिया गांधींना भेटले-काही राजकीय मुद्यांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे आमदार हे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटणार आहेत. काँग्रेसमध्ये कोणतीही नाराजी नसल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केले. आमदार आपल्या नेत्यांना भेटत असतील तर, यामध्ये चर्चा करण्यासारखे काही नाही. पण भारतीय जनता पक्षाकडून अपप्रचार केला जात आहे. याउलट भारतीय जनता पक्षात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. त्यांचे आमदार काँग्रेसच्या संपर्कात आहे. लवकरच आपण भारतीय जनता पक्षाला धक्का देणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.