महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भारत यात्रा संपल्यानंतर प्रियंकासह राहुल गांधी येणार महाराष्ट्रात- नाना पटोले - नाना पटोले भारत यात्रा

भारत यात्रा संपल्यानंतर आम्ही राज्यातील सर्व 6 आयुक्तालयांमध्ये ( rallies in all 6 commissionerates ) रॅली काढू. या रॅलींमध्ये सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि राहुल गांधीही सहभागी होणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले ( Maharashtra Congress president Nana Patole ) यांनी सांगितले.

नाना पटोले
नाना पटोले

By

Published : Nov 19, 2022, 6:35 PM IST

मुंबई :काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी ( Bharat yatra end in Maharashtra ) यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात संपत आहे. अशा स्थिती महाराष्ट्रात काँग्रेस आणखी सक्रिय होणार आहे.

भारत यात्रा संपल्यानंतर आम्ही राज्यातील सर्व 6 आयुक्तालयांमध्ये ( rallies in all 6 commissionerates ) रॅली काढू. या रॅलींमध्ये सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि राहुल गांधीही सहभागी होणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले ( Maharashtra Congress president Nana Patole ) यांनी सांगितले.

राहुल गांधींनी इंदिरा गांधींना वाहिली श्रद्धांजली :राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra), आज इंदिरा गांधी जयंती निमित्त महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. शेगाव येथील गजाननदादा पाटील मार्केटयार्ड येथून सकाळी ६ वाजता यात्रेतील सहभागींनी प्रवास सुरू केला आणि जलंबकडे प्रयाण केले. ही पदयात्रा भास्तान मार्गे जाऊन जळगाव, जामोद शहरात रात्रीचा मुक्काम करणार आहे. यात्रेत बचत गटातील महिला आणि निवडून आलेल्या महिला प्रतिनिधी देखील सहभागी झाल्या आहेत.

नुकतेच नाना पटोलेंनी विरोधकांवर केली टीकामहाराष्ट्रात राहुल गांधींची भारत जोडो पदयात्रा Rahul Gandhis Bharat Jodo Padayatra थांबविण्याची मागणी करणाऱ्या खासदार राहुल शेवाळेंवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी टीका Congress state president Nana Patole केली आहे. ते अकोला जिल्ह्यातील पातूर येथे बोलत होते. भारत जोडो यात्रेला Bharat Jodo Yatra मिळत असलेला प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे पटोले म्हणाले. त्यातूनच राहुल शेवाळेंचं MP Rahul Shewale वक्तव्य आल्याचं ते म्हणाले. राहुल शेवाळेंचे बोलविते धनी दिल्लीत बसलेले असल्याचा टोलाही यावेळी नाना पटोलेंनी लगावला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details