मुंबई :Nana Patole News: महाराष्ट्रातील शिंदे सरकारला केंद्रातील हुकूमशाही सरकारची लागण झाली असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. मंत्रालयात दलालांना मुक्त (Mantralaya Entry) वापर करण्यास परवानगी तर सुरक्षेचे कारण देत सामान्य जनतेला मंत्रालयात प्रवेश नाकारल्या जात असल्याच्या कारणावरून नाना पटोले यांनी सरकारवर निशाणा साधला. (Maharashtra Politics)
सरकारवर साधला निशाणा : केंद्र सरकार मुठभर लोकांसाठी काम करते तसेच राज्य सरकारही काम करत आहे. सरकार सामान्य जनतेची कामे करण्यासाठी आहे. मुठभर लोकांसाठी नाही. आपले काम स्थानिक पातळीवर होत नाही, म्हणूनच लोक मंत्रालयात येत असतात. मंत्रालयात दलालांना मुक्त वावर आहे. सुरक्षेचे कारण पुढे करून सर्वसामान्य जनतेला मात्र मंत्रालयात प्रवेश नाकारला जात आहे, असा घणाघाती आरोप नाना पटोले यांनी केला आहे. (Nana Patole On BJP)
पटोले यांचा राज्य सरकार व केंद्रावर निशाना : सामान्य जनतेचे प्रश्न स्थानिक पातळीवर सुटत नसल्याकारणाने ते मंत्रालयात येत असतात. मात्र आजपासून मंत्रालयामध्ये सामान्य लोकांना प्रवेशासाठी कठोर नियमांना सामोरे जावे लागणार आहे. त्यात काहींना मंत्रालयात प्रवेशदेखील नाकारले जात आहेत. तर नाना पटोले यांनी राज्य सरकारला हुकुमशाही सरकार म्हणत टीका केली आहे.
मंत्रालयात सामान्य जनता ही राजा :2014 सालापासून केंद्रात हुकूमशाही व्यवस्था सुरू झाली असून तीच हुकूमशाही व्यवस्था आता राज्यात आली आहे. हजारो लोक आपल्या कामासाठी मंत्रालयात येत असतात. त्यांना मंत्रालयात येण्याची वेळच का येते? त्यात काही लोक आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कोणी आत्महत्या करू नये अशा प्रकारची काँग्रेसची भूमिका आहे. 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी केली जाते.