महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nana Patole Criticizes on BJP : नाना पटोलेंची भाजपवर सडकून टीका; राज्यपाल महोदयांच्या वक्तव्याचा घेतला समाचार - BJP Leaders should Accept Resignations of MLAs

शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांच्या वक्तव्यानंतर ( After Governor Statement About Shivaji Maharaj ) त्यावर सर्व स्तरातून टीका झाली. आता काॅंग्रेस नेते तथा विधान सभा अध्यक्ष नाना पटोले यांनी ( Nana Patole Criticizes on BJP ) आक्रमक भूमिका घेत भाजपला जाब ( Nana Patole Took Note of The Governors Statement ) विचारला आहे. यावर भाष्य करताना त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. राजीनामा देणार नाही म्हणून भाजपच्या नेत्यांनी आमदार आणि खासदाराचे राजीनामे घ्यायला पाहिजेत. महाराजांचा अपमान होत असेल, तर सत्तेत राहण्याचा यांना अधिकार नाही.

Nana Patole Criticizes on BJP
नाना पटोलेंची भाजपवर सडकून टीका

By

Published : Dec 1, 2022, 5:04 PM IST

मुंबई :छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत ( After Governor Statement About Shivaji Maharaj ) आहेत. परंतु, या दैवताचा भारतीय जनता पक्ष वारंवार ( BJP Repeatedly insulted Chhatrapati Shivaji Maharaj ) अपमान ( Nana Patole Criticizes on BJP ) करीत असून, यातून ( Nana Patole Took Note of The Governors Statement ) भाजपाचा खरा चेहरा उघड झाला आहे. राज्यापाल कोश्यारी, भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्यानंतर आता राज्यातील मंत्री मंगलप्रभात लोढा ( Nana Patole Took Note of The Governors Statement ) यांनीही महाराजांबद्दल गरळ ओकली आहे. सत्तेत असलेल्या आमदार व खासदार यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जर थोडासाही स्वाभीमान शिल्लक असेल तर त्यांनी या अपमानाबद्दल तत्काळ राजीनामे ( BJP Leaders should Accept Resignations of MLAs and MPs ) द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. गांधी भवन येथे पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपाचा समाचार घेतला.

भाजपचा खरा चेहरा आता समोर आला : छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय जनता पक्षाला फक्त निवडणुकीत मते मिळवण्यासाठीच हवे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अरबी समुद्रातील महाराजांच्या स्मारकाचा मोठा गाजावाजा करीत इव्हेंटही केला होता. निवडणुकीत छत्रपतींचा आशिर्वाद घेऊन मतेही मागितली पण सत्तेत येताच भाजपाच खरा चेहरा बाहेर आला.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी शिवरायांबद्दल केले अपमानजनक वक्तव्य : छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली असे निर्ल्लजपणे भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी म्हणाले होते. राज्यपाल कोश्यारी यांनी तर महाराज जुने झाले असे म्हणत गडकरींशी तुलना केली. हे कमी होते की काय म्हणून राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महाराजांच्या आग्रा सुटक्याची तुलना राज्यातील एका पक्षातील बंडखोरांशी केली, हीच भाजपची महाराजांबद्दलची भूमिका आहे हे स्पष्ट झाले आहे. हे अत्यंत निर्लजपणाचे लक्षण असून, आता माफी मागून सारवासारव केली जात आहे पण अशा प्रवृत्तींना माफी नाहीच, याचे प्रायश्चित त्यांना भोगावेच लागेल. भाजपाकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार केला जात असलेल्या अपमानाबद्दल जनतेत प्रचंड संताप आहे, महाराष्ट्राची जनता हे कदापि खपवून घेणार नाही.

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना केंद्र सरकारने शिष्यवृत्ती द्यावी : इयत्ता पहिली ते आठवीत शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना केंद्र शासनाकडून दरवर्षी देण्यात येणारी शिष्यवृत्ती सरकारने अचानक बंद करण्यात आली आहे. सरकारने विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेतले पण आता ही शिष्यवृत्तीच बंद करण्यात आली आहे. राज्यातील १३ लाख विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे. यात फक्त मुस्लीम समाजाचेच विद्यार्थी नाहीत तर शिख, पारशी, ख्रिश्चन, जैन, बौद्ध समाजाच्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. केंद्र सरकारची ही भूमिका विद्यार्थ्यांची अडवणूक करणारी आहे. केंद्र सरकार जर ही शिष्यवृत्ती देत नसेल तर राज्य सरकारने या शिष्यवृत्तीसाठी तरतूद करून शिष्यवृत्ती द्यावी. शिष्यवृत्तीच्या प्रश्नी काँग्रेस पक्ष हिवाळी अधिवेशनात आवाज उठवून विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहेत.

राज्यपालांच्या वक्तव्यानंतर सर्व स्तरातून टीका :राज्यपाल महोदयांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर त्यावर सर्व स्तरातून टीका झाली. आता काॅंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी आक्रमक भूमिका घेत भाजपला जाब विचारला आहे. यावर भाष्य करताना त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. राजीनामा देणार नाही म्हणून भाजपच्या नेत्यांनी आमदार आणि खासदाराचे राजीनामे घ्यायला पाहिजेत. महाराजांचा अपमान होत असेल, तर सत्तेत राहण्याचा यांना अधिकार नाही.

भाजपचे सरकार फसवे :कोरोना काळात केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे लोकांचा जीव गेला. सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने सांगितले मृत्युमुखी पडलेले लोकांना मदत देणार नाही, यात आमचा संबंध नाही. यांच्या या भूमिकेचा आम्ही पक्षातर्फे निषेध करतो. कोरोना काळात पाच राज्यांच्या निवडणुकीच्या तयारीत भाजप होते. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा घोळ करण्याचे पाप सरकार करीत आहे. १० लाख विद्यार्थ्याच्या शिशुवूत्तीचा प्रश्न आहे. त्यामुळे राज्यसरकारने त्यांना मदत केली पाहिजे.

राज्यातील शेतकऱ्यांना मदत नाही :शेतकऱ्यांचे दुःख केंद्र आणि राज्य सरकारला कळत नाही. अतिवृष्टी आणि पीक विम्याचे पैसेदेखील मिळाले नाहीत याचा आम्ही जाब विचारणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यात आम्ही मदत केंद्र उभारली आहेत. मुंबईच्या कार्यालयात आम्ही जाणार आहोत. ५ तारखेपर्यंत आम्ही पावत्या जमा करण्याचे काम आम्ही करणार आहोत. किती शेतकऱ्यांना मदत मिळाली याचा ग्राऊंड रिपोर्ट घेतल्यानंतर काॅंग्रेसकडून मोर्चा काढला जाणार आहे. महाराष्ट्र बंदच्या प्रतिसादाबद्दल तर आम्ही बोलूच, पण आधी सत्तेत असलेल्या सर्वांनी राजीनामे द्यायला पाहिजेत. भय आणि भरभ्रष्टाचारातूनसरकार आले आहे. लोकशाही पद्धतीने आणि लढाई लढणार आहोत.

राज्याचे तुकडे करण्याचा प्रयत्न :सीमा वादावर बोलणे गरजेचे आहे. महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सोलापूर जिल्हा कर्नाटकात नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, राज्यातील ED सरकार गप्प आहेत. म्हणजे ते सत्ता पिपसू आहेत. महाराष्ट्राचे तुकडे करून गुजरात आणि कर्नाटकला द्यायचे आहेत. निवडणुका पाहून कर्नाटकला काही भाग देता येतो का? हा प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू आहे. संपूर्ण राज्यात पिक विमा बीड पॅटर्न राबवण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न होता. मात्र, केंद्र सरकारने तो होऊ दिला नाही. त्यामुळे फडणवीस हे शेतकऱ्यांबद्दल केवळ निराधार वकत्व्य करीत आहेत समान नागरी कायदामुख्य विषयाला वळण देण्यासाठी असे विषय आणले जातात. बेरोजगारी महागाई हे मुद्दे आहेत. कायदा हा सर्वांसाठी एकच आहे. महाराष्ट्राची जनता सुजाण आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details