महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

BJP-Congress Agitation Mumbai : आजचे आंदोलन स्थगित; मात्र, पंतप्रधान माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार - नाना पटोले - nana patole on pm modi

काँग्रेसकडून भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Congress Agitation infront of Devendra Fadnavis House ) यांच्या घराबाहेर काँग्रेस आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातून देशभर कोरोना पसरला, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत ( PM Modi in Loksabha ) केलं होतं.

नाना पटोले
नाना पटोले

By

Published : Feb 14, 2022, 12:05 PM IST

Updated : Feb 14, 2022, 12:35 PM IST

मुंबई -काँग्रेसकडूनभाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Congress Agitation infront of Devendra Fadnavis House ) यांच्या घराबाहेर काँग्रेस आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातून देशभर कोरोना पसरला, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत ( PM Modi in Loksabha ) केलं होतं. त्याच्या निषेधार्थ काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात येत आहे. मात्र, काँग्रेसच्या आंदोलनाला भाजप कार्यकर्ते त्यांच्यात असे उत्तर देते असा इशारा भाजपकडून ( Bjp-Congress Agitation Mumbai ) देण्यात आला आहे.

माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

पंतप्रधानांनी माफी मागावी -

तर वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांना यांना सोबत घेऊन आम्ही शांततेत आंदोलन करत आहोत. मला निवासस्थानी अडवले असले तरी काँग्रेस कार्यकर्ते, प्रवक्ते हे देवेंद्र फडणीस यांच्या घरापर्यंत पोहोचले आहेत. काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच पोलिसांनी नाना पटोले यांनादेखील त्यांच्या निवासस्थानी थांबवल्यानंतर आपल्या निवासस्थानाहूनच नाना पटोले यांनी भाजप विरोधात आंदोलन सुरू केले. हे आंदोलन पंतप्रधान माफी मागत नाही तोपर्यंत सुरू राहील, असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे. नाना पटोले हे देवेंद्र फडणवीस यांच्या घरापर्यंत पोहचु नये यासाठी पोलिसांनी देखील बंदोबस्त नाना पटोलेंच्या घराबाहेर बंदोबस्त लावला आहे.

हेही वाचा -Sanjay Raut : जो उखाड़ना है, उखाड़ लो, हम डरेंगे नहीं! संजय राऊत आक्रमक

दरम्यान, काँग्रेसचे आंदोलन आज पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र, पुन्हा भाजपच्या नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.

Last Updated : Feb 14, 2022, 12:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details