प्रतिक्रिया देताना नाना पटोले मुंबई : राज्यातील शेतकरी, कामगार, तरुणवर्ग, महिला तसेच सामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम आम्हाला करायचे आहे. त्यामुळे सरकारच्या आम्ही गमतीजमती नाही बघत. तसेच सभागृहात पण यांच्या गमतीजमती चालतात, असे म्हणत सरकारला टोला लगावला आहे. महागाई, बेरोजगारी यासह अनेक ज्वलंत प्रश्न आहेत. या प्रश्नांवर सरकारला जाब विचारून जनतेला न्याय देण्याचे काम आम्हाला करायचे आहे, जनता अहंकारुपी सरकारला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
रोहिणी आयोगाची शिफारस : काँग्रेसची मागणी आहे की, जातीनिहाय जनगणाना करा. शोषित पीडितांवर अन्याय करणे हा सरकारचा उद्देश आहे. आम्ही रोहिणी आयोगाचा विरोध करतो. दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे हे ठरवून केले आहे. मोदी सरकारने रोहिणी आयोगाची शिफारस राष्ट्रपतींकडे केली. जातीत वर्गीकरण करुन ओबीसींचे आरक्षण कमी करण्याचा घाट आहे. आपापसात भांडण लावून सत्ता कशी मिळवता येईल असा प्रयत्न भाजपा करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे : ओबीसींच्या आरक्षणावर घाला घालण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. देशाचे प्रधानमंत्री स्वतः ला ओबीसी म्हणतात मग ओबीसींवर अन्याय का? आमची भूमिका स्पष्ट आहे, प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे. त्यामुळे जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. नाही तर तुम्ही नकली ओबीसी आहात असे समजावे लागेल, असा टोला पटोले यांनी पंतप्रधान यांना लगावला.
काँग्रेसमध्ये अंतर्गत कटुता नाही : अधिवेशन काळात काँग्रेस आमदारांची बैठक होत असते. ही ठरलेली बैठक असते. काँग्रेसच्या आमदारांमध्ये अंतर्गत कुठेही कटुता नाही. आम्ही पक्षातील सर्व आमदार एकजूट आहोत. कोणताही आमदार नाराज नाही. संग्राम थोपटे यांच्या नावावरून आग लावायचे काम भाजपा करत आहे. सरकारच्या पापामध्ये आमच्या आमदारांना टाकू नका, असे आवाहन नाना पटोले यांनी केले आहे. पण पुढल्या वेळी देशात काँग्रेसचे सरकार येईल तेव्हा सर्वांना न्याय मिळेल. आम्ही लोकांना शब्द दिला आहे. आम्ही जातिनिहाय जणगणना करणार आणि प्रत्येकाला न्याय देणार असल्याचे पटोले म्हणाले आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिली नाही. या प्रगत राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बिघाड झाला असून, भ्रष्टाचारी सरकारमुळे नागरिकांना त्रास सोसावा लागत असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे.
पेपर फुटीवर सरकार खोटे बोलत आहे : राज्यात पेपरफुटीची प्रकरणे उघड होत आहे. माझ्याकडे एफआयआरच्या कॉपी आहेत. पण पेपरला आलेल्या बातम्या खोट्या आहेत. त्यावर हक्कभंग लावू असे सरकारने सांगितले अशी खोटी उत्तरे सरकारने देऊ नयेत. आता सक्षम विरोधी पक्षनेता आल्याने सरकारला खोटे उत्तर देत असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे.
हेही वाचा-
- Nana Patole on Opposition Leader : पुढच्या आठवड्यात ठरणार काँग्रेसचा विरोधी पक्षनेता - नाना पटोले
- INDIA Meeting in Mumbai : सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत 'INDIA' ची बैठक; यजमानपदावरुन महाविकास आघाडीत वाद?
- Nana Patole On MLA Fund : दोन दिवसांत काँग्रेस आमदारांना विकासनिधी द्या, अन्यथा कोर्टात जाणार - नाना पटोले