मुंबई :आळंदीहून प्रस्थानावेळी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यातील वारकरी बांधवांवर पोलीसांनी लाठीमार केला. महाराष्ट्राची समृद्ध परंपरा असलेल्या शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या आषाढी वारीला गालबोट लागले आहे. गालबोट लावण्याचे काम राज्यातील पोलिसांनी केले. पंढरपूर वारीत सामील झालेल्या वारकऱ्यांवर लाठीचार्ज करण्याची मजल गेली आहे, असे नाना पटोले म्हटले आहेत, तर अजित पवार यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
कोणतेही आध्यात्मिक कार्य असले तरी धार्मिक हेतू बाजूला ठेवला पाहिजे. पंढरपूर वारीसारख्या सोहळ्यात सहभागी होतानाही सर्वांनी राजकीय हेतू बाजूला ठेवावा. ईश्वरभक्ती आणि वारकऱ्यांची सेवा हाच हेतू मनात ठेवून वारीत सहभागी व्हा.- अजित पवार
तीव्र शब्दात निषेध :महाराष्ट्राच्या संत आणि भक्तीपरंपरेचे वैभव असलेल्या पंढरपूर वारीच्या इतिहासात असे यापूर्वी घडले नव्हते. सोहळ्याचे योग्य नियोजन करुन हा प्रसंग टाळता आला असता, असे सांगून वारकऱ्यांवरील पोलीस लाठीमाराचा आणि सरकारचा अजित पवार यांनी तीव्र शब्दात निषेध केला. प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनामुळे हे घडल्याचे दिसत असल्याचा थेट आरोप अजित पवार यांनी केला. ही संपूर्ण घटना दु:खदायक, तशीच मनाला चीड आणणारी आहे. अशी घटना यापुढे घडू नये, यासाठी पूर्ण काळजी घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
शिंदे-फडणवीस सरकार म्हणजे ग्रहण :शिंदे-फडणवीस सरकार म्हणजे राज्याला लागलेले ग्रहण आहे. दररोज राज्यात गुन्हे घडत आहेत. वारकऱ्यांवर हल्ला म्हणजे भक्तांचा व विठुरायाचा घोर अपमान करण्यासारखे आहे.अ सा प्रकार होऊच कसा शकतो, असा प्रश्नही नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. पोलीसांना कोणी अधिकार दिला वारकऱ्यांवर लाठीमार करण्याचा? वारीचे नियोजन करण्यात सरकार अपयश आले आहे, असे ते म्हणाले.
तीन महिन्यात १० ठिकाणी दंगली :राज्यात गेल्या तीन महिन्यात १० ठिकाणी दंगली झाल्या. हिंदू संघटनांच्या नावाखाली काही लोक जाणीवपूर्वक समाजात तेढ निर्माण करत आहे. पोलीस मात्र विरोधकांवर कारवाई करण्यात तत्परता दाखवीत आहे. अन्याय करणारे, गुन्हेगार, दंगेखोर, बलात्कारी अशांवर कारवाई करताना, फडणवीसंना हाताला लखवा मारतो की काय? असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला. राज्यातील एखादी गंभीर गोष्ट विरोधी पक्षाने जर उचलली तर त्याची गृहमंत्र्यांकडून खिल्ली उडवली जाते. गृहमंत्र्यांना पोलीस दलातील अधिकारी जुमानी नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गृहमंत्र्यांनी आपल्या गृहमंत्री पदावर राहणे महाराष्ट्रासाठी गंभीर गोष्ट आहे. बेकायदेशीर पापी सरकारला जनता धडा शिकवेल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला
हेही वाचा :
- Lathi Charge On Varkari : आळंदीत वारकऱ्यांवर लाठीचार्ज, पोलीस आयुक्त म्हणतात फक्त किरकोळ झटापट, विरोधी पक्षांच्या तीव्र प्रतिक्रिया
- Brijbhushan Singh Recited Poetry : कभी अश्क . . कभी गम . . .और कभी जहर पिया जाता; भाजपच्या सभेत ब्रिजभूषण सिंहांचा शायराना अंदाज
- Saint Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala: ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा करणार आज पंढरपूरकडे प्रस्थान; लाखो भाविक आळंदीत दाखल