मुंबई- राजकारणात प्रवेश केला, तर प्रश्न विचारायचे स्वातंत्र्य गमावून बसेल, असे मत अभिनेता नाना पाटेकर यांनी व्यक्त केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून नाना राजकारणात सक्रिय होणार, अशा चर्चा सुरू होत्या. एवढंच नाही तर नाना भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या वावड्या उठत होत्या. मात्र त्या सगळ्या चर्चांना आता नाना यांनीच पूर्णविराम दिला आहे.
हेही वाचा - देशातील मंदीचे संकट दूर व्हावे, गणराया चरणी सोनालीचे साकडे
नानाचा घरचा गणपती यंदा त्यांच्या मातोश्रीचं निधन झाल्यामुळे साधेपणाने साजरा करण्यात येतोय. तर यंदा सांगली आणि कोल्हापूरमध्ये आलेल्या पुराचं सावत असल्याने सण साजरा करावासा वाटत नसल्याचं त्यांनी सांगितलं. हा गणेशोत्सव आपला शेवटचा गणेशोत्सव असून पुढील वर्षांपासून फक्त घरातील एक सदसय म्हणून गणेशोत्सवाला उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.