महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जे जे रुग्णालयाला 23 लाखांचा धनादेश; नाना पालकर स्मृति अन् तुलसीयानी ट्रस्टचा पुढाकार - डॉ. तात्याराव लहाने

मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या पाहता जे. जे. रुग्णालयामध्ये त्यांच्यावर तातडीचे उपचार करण्यासाठी लागणारी यंत्र सामुग्री, एक्सरे मशीन घेण्यासाठी २३ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. नाना पालकर स्मृती समिती आणि तुलसीयानी ट्रस्ट तर्फे हा धनादेश देण्यात आला.

JJ Hospital
जे जे रुग्णालय मदत

By

Published : May 6, 2020, 11:38 AM IST

मुंबई - दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. या रुग्णांवर उपचार करताना कोणती गैरसोय होऊ नये, यासाठी नाना पालकर स्मृती समिती आणि तुलसीयानी ट्रस्ट तर्फे जे.जे. रूग्णालयाला 23 लाख रुपये धनादेश देण्यात आला आहे.

मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या पाहता जे. जे. रुग्णालयामध्ये त्यांच्यावर तातडीचे उपचार करण्यासाठी लागणारी यंत्र सामुग्री, एक्सरे मशीन घेण्यासाठी २३ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. सुमन रमेश तुलसीयानी ट्रस्ट तर्फे आज हा धनादेश वैद्यकीय संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडे देण्यात आला. यावेळी जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. माणकेश्वर, तुलसियानी ट्रस्टचे मनीष रूपानी, सुदेश शिर्के, दत्तात्रय विभुते, नाना पालकर स्मृती समितीचे व्यवस्थापक कृष्णा महाडिक उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details