मुंबई:शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील प्रमुख साक्षीदार राहुल मुखर्जीची (Rahul Mukherjee) आज सत्र न्यायालयात (Sessions Court) साक्ष नोंदविण्यात आली. गेल्यावेळी झालेल्या साक्षी दरम्यान राहुलने राणी मुखर्जी आणि माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या संदर्भात वक्तव्य केले होते आज झालेल्या सुनावणीच्यावेळी त्याने पुन्हा एकदा मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकार्याचे नाव घेतले आहे. राहुल याने पीटर आणि इंद्राणीला फोन केला होता. त्या वेळी दोघांनी सांगितले की शीना गायब झाल्यानंतर तत्काळ सह पोलिस आयुक्त देवेन भारती यांना भेटलो. तुम्ही मिसिंग कम्पलेंट दाखल करु नका आम्ही तिचा मोबाईल ट्रेस करतोय असे देवेन भारती बोलले होते. असे म्हणले आहे.
शीनाचा मोबाईल ट्रेस करण्यात आला त्यावेळी तिचे लोकेशन मुंबई एअरपोर्ट दाखवण्यात येत होते. त्यावेळी शीना निशांत खुराणा नावाच्या व्यक्ती सोबत फोनवर बोलत असल्याचे राहुलला त्याचे वडील पीटर यांनी सांगितले होते. त्यावेळी राहुलने म्हटलेकी शीनाचा या नावाचा कुठलाही मित्र नाही आहे. तिने मला कधिही या नावाचा मित्र असल्याचे सांगितले नाही. त्यावेळी मी निशांत खुराणा चा नंबर मागितला त्यावेळी मला सांगण्यात आले की या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपल्याला ही माहिती दिली आहे. त्यामुळे त्यांच्या तपासात कुठल्याही बाधा येईल किंवा त्यांना त्रास होईल असे आपण काही करू नये असे सांगण्यात आले आहे.
सीबीआय संचालकांना लिहिलेल्या पत्रात इंद्राणीने म्हटले आहे की, नुकतीच मी तुरुंगात एका महिलेला भेटले जिने सांगितले की ती काश्मीरमध्ये मी शीना बोराला भेटली होती. इंद्राणीने सीबीआय संचालकांना शीनाचा काश्मीरमध्ये शोध घ्यावा अशी मागणी केली आहे. इंद्राणी शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे ती 2015 पासून मुंबईच्या भायखळा कारागृहात बंद होती. एम्सच्या फॉरेन्सिक विभागाने तयार केलेल्या या अहवालानुसार 2015 साली तपासादरम्यान सापडलेला सापळा हा शीना बोराचाच असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.