मुंबईNaked Dance Case Bhandara:शेतीची कामं चालू असताना सांस्कृतिक जगतामध्ये किंवा कलाक्षेत्रामध्ये संगीत, नृत्य हा त्याचा अविभाज्य भाग आहे; परंतु ज्या प्रकारे याचं व्यापारीकरण होऊन नाचणाऱ्या स्त्रियांना विवस्त्र होण्यासाठी भाग पाडणं आणि मग पैसे उधळले जाणं हा जो निंदनीय प्रकार भंडारा जिल्ह्यात घडलेला आहे. ती केवळ एक घटना नसून तो गंभीर गुन्हा असल्याचं मत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज (बुधवारी) व्यक्त केलं. त्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून या घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.(Neelam Gorhe On Naked Dance Case)
महिलेला विवस्त्र होण्यासाठी भाग पाडणं हा गुन्हा :भंडारा जिल्ह्यातील नाका डोंगरी भागामध्ये आणि त्याचबरोबर मोहाडी तालुक्यातल्या बीड या ठिकाणी १७ नोव्हेंबर रोजी एका नर्तकीनं विवस्त्र होऊन डान्स केला. दरम्यान काही जणांनी तिच्यावर नोटा उधळल्या. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे. यासंदर्भात, विशेष पोलीस महानिरीक्षक दोरजे यांच्याशी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दूरध्वनीद्वारे सविस्तर चर्चा केली. सार्वजनिक ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये महिलेला विवस्त्र होण्यासाठी भाग पाडणं हा गुन्हा मानला गेला पाहिजे. तसंच रात्रीच्या वेळेला अशा प्रकारे लोकांची गर्दी जमते आणि स्त्रियांना विवस्त्र करते, यामध्ये नोटा उधळल्या जातात. जेणेकरून त्यांनी अश्लील हावभाव करत नाचावं. त्यामुळे कायद्याचा भंग झालेला आहे, असं त्या म्हणाल्या.