मुंबईGarib Rath Express News :नागपूर या रेल्वे स्थानकातून काल गरीब रथ एक्सप्रेस निघाली. हजारो प्रवाशांना घेऊन धावली. मात्र मध्य रेल्वेच्या मनमाड रेल्वे स्थानकापासून तिने दुसरा मार्ग धरला. जोरात धावणारी गरीब रथ औरंगाबादच्या दिशेने धावू लागली. प्रवाशांना समजलेच नाही की गाडी पुण्याला पोहोचते आहे की कुठे? असा प्रश्न आतील सर्व प्रवाशांना पडला.
ज्येष्ठ नागरिकाची प्रकृती बिघडली:मनमाड या मध्य रेल्वेच्या जंक्शन रेल्वे स्थानकातून गरीब रथ एक्सप्रेस औरंगाबादला निघाली. वाटेतच छोट्या रेल्वेस्थानक असलेल्या परंतु तिथे कुठे थांबाही नाही अशा ठिकाणी ती थांबली. एक ते दोन तास इतका वेळ तिथे गरीब रथ एक्सप्रेस थांबली. त्यामुळे प्रवाशांना पाणी आणि जेवण्यासाठी अन्नही मिळेना. नाश्त्यासाठी पॅकेजिंग असलेलं फूड देखील तिथे मिळेना अशी स्थिती झाली. या संपूर्ण ट्रेनमध्ये हजारो प्रवासी होते. त्यापैकी श्रीकांत वसंत वैद्य हे ज्येष्ठ नागरिक यांची तब्येत बरी नसल्यामुळे ती अधिकच बिघडली.
तर रेल्वे प्रशासन जबाबदार राहणार:यासंदर्भात पुण्यातील कोथरूड या परिसरातील गणेश नगर भागात राहणारे वसंत वैद्य त्या ट्रेनमध्ये सध्या आहेत. ईटीव्ही भारतशी बोलताना वसंत वैद्य यांच्या पत्नी ऋचा वैद्य यांनी सांगितले की, कालची सायंकाळी 6 वाजण्याची गाडी नागपूर येथून निघाली. परंतु पुण्याला ती निश्चित वेळेत पोहोचली नाही. जर पूर्वनियोजन रेल्वेने केलं होतं तर जेथे थांबा नाही अशा रेल्वेच्या अत्यंत छोट्या स्थानकात गाडी थांबवली. यावर तेथे खाण्या-पिण्याची आणि लाईट गाडीत असण्याची व्यवस्था असायला हवी होती. माझे पती वसंत वैद्य हे ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे त्यांना प्रवासात औषधे अनिवार्य असतात. परंतु रेल्वे अशा ठिकाणी थांबली की पाणीच मिळाली नाही. त्यामुळे त्यांचे अतोनात हाल झाले आहेत. उद्या त्यांचं जर काही कमी जास्त झालं. तर याला रेल्वे जबाबदार असेल, असं त्यांनी ठणकावून सांगितलं.