महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत तब्बल 21 कोटीचे 7 किलो युरेनियम जप्त; दोघांना अटक - नागपाडा एटीएसकडून युरेनियम जप्त बातमी

नागपाडा एटीएसने युरेनियमची विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 7 किलो 100 ग्राम युरेनियम जप्त करण्यात आले. तसेच न्यायालयाने दोन्ही आरोपींना 12 मेपर्यंतची एटीएस कोठडी सुनावली आहे.

nagpada ats confiscated 7 kg Uranium
नागपाडा एटीएसकडून 7 किलो युरेनियम जप्त; दोघांना अटक

By

Published : May 6, 2021, 3:07 PM IST

Updated : May 6, 2021, 3:14 PM IST

मुंबई -अवैध रित्या युरेनियमची विक्री करणाऱ्या दोघांना नागपाडा एटीएसने अटक केली आहे. जीगर पंड्या आणि अबुल ताहिर फजल हुसेन, असे या दोघांचे नाव आहे. या आरोपींकडून तब्बल 21 करोड 30 लाख रुपये किंमतीचा 7 किलो 100 ग्राम इतका युरेनियमचा साठा जप्त केला आहे.

एटीएसने जप्त केले 7 किलो 100 ग्राम युरेनियम -

एक व्यक्ती अवैधरित्या युरेनियमची विक्री करणार असल्याची गोपनीय माहिती नागपाडा एटीएसला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एटीएसने सापळा रचत जीगर पंड्या याला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता युरेनियमचे तुकडे अबू ताहिर व अफजल चौधरी याने जीगरला विक्रीला दिले असल्याचे सांगितले. जीगर आणि अबू हे एकमेकांचे मित्र आहेत. त्यानंतर एटीएसने अबु ताहिर यांच्या लोहार गल्लीमधील गाळ्यात छापा टाकला. यावेळी 7 किलो 100 ग्राम युरेनियम जप्त करण्यात आले. या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना 12 मे पर्यंतची एटीएस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा - राज्यात आठवडाभर ढगाळ वातावरण, मुंबईकरांना सहन करावे लागणार चटके

Last Updated : May 6, 2021, 3:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details