मुंबई - हिंदू पेपरचे चेअरमन एन. राम यांनी राफेल घोटाळा या विषयावर यशवंत चव्हाण प्रतिष्ठाण, मुंबई येथे कलेक्टिवच्या निमित्ताने उपस्थितांशी सवांद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केले. यावेळी राफेलवर ते प्रामुख्याने बोलले.
'राफेलप्रकरणी न्यायालयात सारवासारव करणे केंद्र सरकारसाठी लज्जास्पद' - rafale deal
हिंदू पेपरचे चेअरमन एन. राम यांनी राफेल घोटाळा या विषयावर यशवंत चव्हाण प्रतिष्ठाण, मुंबई येथे कलेक्टिवच्या निमित्ताने उपस्थितांशी सवांद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केले. यावेळी राफेलवर ते प्रामुख्याने बोलले.
!['राफेलप्रकरणी न्यायालयात सारवासारव करणे केंद्र सरकारसाठी लज्जास्पद'](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2655508-149-b448dee7-225b-477c-b5a9-4c10e5b8d9ea.jpg)
एन. राम म्हणाले, की राफेल घोटाळा हा विषय आता जगभर परिचयाचा झाला आहे. या प्रकरणातील काही कागदपत्रे 'द हिंदू' पेपरने उघडकीस आणले होते. त्या नंतर सगळीकडे हे प्रकरण गाजले होते. पुढे ते म्हणाले, की न्यू राफेल डील १० एप्रिल २०१५ मध्ये मांडण्यात आली. किमती वाढवल्या, बँक गॅरन्टीही यावेळी घेण्यात आली नाही. यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता होती. मोदी हे भ्रष्टाचाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप ही त्यांनी केला.
राफेल लढाऊ विमान व्यवहार प्रकरणाची महत्त्वाची कागदपत्र गहाळ झाल्याची माहिती देशाच्या महाधिवक्त्यांनीच सर्वोच्च न्यायालयात दिली होती. तेव्हा काही कागदपत्रे संरक्षण मंत्रालयातून गहाळ झाल्याचे महाधिवक्त्यांनी सांगितले. मात्र, आता ते सारवासारव करत आहेत. सर्वोच्च न्यायालयामध्ये चोरीचा आरोप करणे आणि नंतर सारवासारव करणे हे केंद्र सरकारसाठी लाजिरवाणे आहे, असे वक्तव्य त्यांनी केले.