महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'माझा आमदार माझा मुख्यमंत्री' मातोश्रीबाहेर फलक - My mla, my cm banners in mumbai

मुंबईत मातोश्रीबाहेर लावण्यात आलेल्या पोस्टर्सवर 'माझा आमदार, माझा मुख्यमंत्री' आणि 'साहेब, आपण करून दाखवलं' असाही संदेश लिहिण्यात आला आहे. शिवसेनेचे नगरसेवक हाजी हलीम खान यांनी हे पोस्टर लावण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेनेची मुख्यमंत्रिपदाची मागणी अद्यापही कायम आहे, हे दिसून येते. या पोस्टरच्या माध्यमातून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे होताना दिसत आहे.

'माझा आमदार माझा मुख्यमंत्री' मातोश्रीबाहेर फलक

By

Published : Nov 5, 2019, 3:23 PM IST

मुंबई - विधानसभा निवडणूकीचा निकाल लागून 13 दिवस झाले आहेत. राज्यातील जनतेने भाजप-सेनेच्या युतीला स्पष्ट जनादेश दिल्यानंतरही मुख्यमंत्रीपदावरून दोनही पक्षांमधील संघर्ष इर्षेला पोहचला आहे. शिवसेना मुख्यमंत्रिपदाच्या आपल्या मागणीवर ठाम आहे. तर दुसरीकडे भाजपा मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्यास तयार नाही. अशातच शिवसेनेकडून पुन्हा एकदा पोस्टर वॉर सुरू झाले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर 'माझा आमदार, माझा मुख्यमंत्री' अशा लिहलेल्या स्वरूपाचे पोस्टर लावण्यात आले आहे. त्यावर युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे.

हेही वाचा -शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मंगळवारी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर; नुकसानग्रस्त शेतीची करणार पाहणी

त्यात 'माझा आमदार, माझा मुख्यमंत्री' आणि 'साहेब, आपण करून दाखवलं' असाही संदेश लिहिण्यात आला आहे. शिवसेनेचे नगरसेवक हाजी हलीम खान यांनी हे पोस्टर लावण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेनेची मुख्यमंत्रिपदाची मागणी अद्यापही कायम आहे, हे दिसून येते. या पोस्टरच्या माध्यमातून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे होताना दिसत आहे. तर भाजप शिवसेनेला मुख्यमंत्री देते का, तसेच तसे नाही झाल्यास शिवसेना काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details