मुंबई - पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक ( Teachers Constituencies Election ) जाहीर होताच सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात ( Graduate Constituencies Election ) केली आहे. विधान परिषदेच्या जून-जुलै दरम्यानच्या निवडणुकीत आघाडीची बरीच मते फुटल्याने भाजपचे उमेदवार निवडून आले. महाविकास आघाडीने ( Maha Vikas Aghadi ) राज्यसभेच्या निवडणुकीतून ( Rajya Sabha Election ) धडा घेतला असून या निवडणुकीत विशेष गुप्तता पाळली जात आहे. राज्यसभेप्रमाणे या निवडणुकीत अंतर्गत दुफळी निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. मात्र पहिल्यासारखा हा वाद पुन्हा निर्माण झाल्यास भाजपला याचा फायदा होण्याची शक्यता आहे.
पदवीधर, शिक्षक मतदार संघासाठी ३० जानेवारीला मतदानराज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचे सूप वाजताच जाहीर झालेल्या विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. नाशिक आणि अमरावती या पदवीधर, तर नागपूर, कोकण आणि औरंगाबाद या शिक्षक मतदार संघात निवडणूक ( Teachers Constituencies Election In Maharashtra ) होत आहे. निवडणुकीची अधिसूचना ५ जानेवारीला निघणार आहे. १२ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. तर यासाठी ३० जानेवारीला मतदान होणार असून २ फेब्रुवारीला निकाल जाहीर होईल. या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे.
विक्रम काळेंना पुन्हा पसंतीसध्या विधान परिषदेत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये संख्याबळाची चुरस आहे. येत्या काळात सभापती निवडणुकीच्या दृष्टीने सर्वाधिक सदस्य असणाऱ्या पक्षाचा सभापतीपदाचा उमेदवार असण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी विरोधात भाजप आणि शिंदे गटाकडून ( Shinde Faction ) जोर लावला जात आहे. पाच जागांसाठी ही निवडणूक होत असली तरी भाजपकडून अमरावती पदवीधर मतदार संघात विद्यमान आमदार रणजित पाटील आणि नागपूर शिक्षक मतदार संघात विद्यमान आमदार ना. गो. गाणार यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरु आहेत. महाविकास आघाडीतील काँग्रेसने अमरावती आणि नाशिक पदवीधर निवडणूक लढवण्याबाबत भूमिका मांडली आहे. एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसची रिक्त झाल्याने राष्ट्रवादीकडून विक्रम काळे यांच्या नावाला पुन्हा पसंती मिळण्याची शक्यता आहे.
उमेदवारीसाठी तयारीअमरावती पदवीधरमध्ये प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सुधीर ढोणे यांचे नाव चर्चेत आहे. गेली दोन वर्षे ते पदवीधर निवडणुकीसाठी तयारी करत आहेत. येथे माजी अर्थ राज्यमंत्री तसेच जलसंपदा आणि पाटबंधारे विभागाचे मंत्रीपद भूषवलेले नेते सुनील देशमुख हे सुद्धा उमेदवारीच्या शर्यतीत आहेत. अमरावती जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बबलू ऊर्फ अनिरुद्ध देशमुख हे सुद्धा उमेदवार यादीत चर्चेतील नाव आहे. डॉ. सुधीर तांबे हे विधान परिषदेचे काँग्रेस गटनेते आहेत. २००९ पासून नाशिक मतदार संघावर त्यांची पकड आहे. भाजपच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ त्यांनी खेचून आणला होता. सुधीर तांबे हे काँग्रेस विधी मंडळ नेते बाळासाहेब थोरात यांचे मेव्हणे आहेत.
तर अंतर्गत वादाचा भाजपला फायदानाशिक आणि अमरावती मतदार संघावर काँग्रेसने दावा ( Congress claims Amravati constituency ) ठोकला. त्यानंतर उर्वरित नागपूर औरंगाबाद आणि कोकण शिक्षक मतदार संघात राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात जागेसाठी चुरस रंगणार आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या जागेवर शिवसेनेकडून दावा सांगितला जाण्याची शक्यता आहे. उर्वरित दोन जागांवर उमेदवारीबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्हींकडून जागांसाठी तयारी सुरु आहे. मात्र, भाजपला रोखण्यासाठी रणनीती आखली जात आहे. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून बिनसल्यास भाजपला याचा फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्यसभा निवडणुकीचा महाविकास आघाडीला धडाविधानसभेतून राज्यसभेवर निवडून गेलेल्या सहा जागांपैकी भाजपने तीन जागा राखल्या. महाविकास आघाडीतील अनेक मते फुटल्याने भाजपचे तीन सदस्य मोठ्या संख्येने निवडून गेले. अंतर्गत संघर्षामुळे महाविकास आघाडीला फटका बसला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सेनेतून 40 आणि दहा अपक्ष आमदार फुटले. राज्यसभेच्या निवडणुकीचा महाविकास आघाडीने यावेळी धडा घेतला असून खबरदारी ही घेतली जात आहे. पाचही जागा निवडून आणण्यासाठी प्लान तयार केला जात आहे. तीन्ही पक्षांनी एकत्रितपणे लढल्यास भाजपला त्याचा फटका बसू शकतो.
महाविकास आघाडीला राज्यसभेतील चूक टाळण्याची गरजराज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत एकमत नव्हते. बैठकांमध्ये घेतले गेलेले निर्णय राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेतील अनेकांना मान्य नसल्याचे शिवसेनेतील फुटीनंतर समोर आले. आता पदवीधर आणि शिक्षक निवडणुका जाहीर झाल्याने महाविकास आघाडीने राज्यसभेतील चूक टाळण्याची गरज आहे. भाजपला रोखायचे असल्यास एकत्रित येऊन सामाना करायला हवा. अंतर्गत नाराजी असल्यास भाजपला त्याचा फायदा नक्की होईल, असे मत वरिष्ठ पत्रकार श्रीरंग सुर्वे यांनी मांडले.