महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, मुस्लीम महिलांनी माहीम दर्ग्यात चढवली चादर

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, यासाठी मुंबईमधील महिलांनी आज माहिमच्या दर्ग्यात चादर चढवली आणि त्यांच्या विजयासाठी दुआ मागितली.

मुस्लीम महिला

By

Published : Apr 26, 2019, 5:03 PM IST

Updated : Apr 26, 2019, 10:01 PM IST

मुंबई - नरेंद्र मोदी निवडून येऊन पुन्हा पंतप्रधान व्हावेत, यासाठी माहिमच्या बाबा मखदूम शाह दर्गावर मुस्लीम महिलांनी आज चादर चढवली. तसेच मोदींच्या विजयासाठी प्रार्थनाही केली.

मुस्लीम महिलांनी माहीम दर्ग्यात चढवली चादर

पंतप्रधान मोदी यांनी मुस्लीम महिलांना तिहेरी तलाकसारखी वाईट प्रथा बंद करून आत्मसन्मान मिळवून दिला आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. तसेच मुस्लीम समाजासाठी मोदी सरकारने खुप कामे केली आहेत. तिहेरी तलाक सारखा कायदा आणला. हे सरकार काम करणारे सरकार आहे. त्यामुळे ते पुन्हा निवडून यावे, यासाठी आज मुस्लीम महिलांनी माहिम दर्गा येथे दुआ केली, अशी माहिती मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे हाजी एस आझाम यांनी दिली.

Last Updated : Apr 26, 2019, 10:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details