मुंबई - राज्यात बकरी ईदसाठी काही नियम शिथील करण्यात यावेत. कुर्बानीसाठी बकरे सहजपणे बाजारात मिळतील अशी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, आदी मागण्यांसाठी आज (सोनवार) राज्यातील मुस्लिम आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मागील अनेक दिवसांपासून सरकारकडे आम्ही याचा पाठपुरावा करतोय, परंतु समाधानकारक उत्तर आले नसल्याने, आपणच आता पुढाकार घ्यावा, अशी मागणीही या आमदारांनी केली असल्याचे सांगण्यात आले. पवार हे मुख्यमंत्र्यांशी बोलून यावर तोडगा काढतील, असा विश्वास यावेळी मुस्लिम आमदारांकडून व्यक्त करण्यात आला.
मुस्लिम आमदारांनी पवारांकडे मांडल्या व्यथा, बकरी ईदच्या कुर्बानीसाठी नियम शिथील करण्याची मागणी - बकरी ईदसाठी नियम शिथील करावे
राज्यात बकरी ईदसाठी राज्यात काही नियम शिथील करण्यात यावेत. कुर्बानीसाठी बकरे सहजपणे बाजारात मिळतील अशी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, आदी मागण्यांसाठी आज (सोनवार) राज्यातील मुस्लिम आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.
मुस्लिम आमदारांनी पवारांकडे मांडल्या व्यथा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही सर्व प्रकारची खबरदारी घेणार आहोत. यासाठीचा कार्यक्रमच आम्ही सादर केला असून, तोच कार्यक्रम घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांकडेही जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर या बैठकीत आपल्याला समाधानकारक उत्तर मिळाले असून, आता सरकारकडून त्यासाठी लवकर नियमावली तयार करण्यात यावी, अशी मागणी यावेळी मुस्लिम आमदारांनी केली होती अशी माहितीही देण्यात आली.