मुंबई :एकामुस्लिम मुलाने हिंदू मुलीशी प्रेमापायी हिंदू धर्म स्वीकारला, मात्र आता लग्नानंतर काही महिन्यातच मुलीला घटस्फोट हवा आहे. फैज अन्सारी आणि ममता ( नाव बदलले आहे ) यांचे एकमेकांवर प्रेम होते. या प्रेमाचे रुपांतर लग्नात झाले. लग्नाच्या वेळी मुलाने मुस्लिम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला. लग्न झाल्यानंतर ते काही दिवस सोबत राहिले. मात्र त्यानंतर मुलाने तक्रार दाखल केली की, मुलीच्या आई-वडिलांनी तिला राजस्थानला पळवून नेले. आज या संदर्भात न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी मुलीने न्यायालयात तिला घटस्फोट हवा आहे, अशी इच्छा व्यक्त केली.
Muslim Boy Converted To Hindu : हिंदू मुलीशी लग्न करण्यासाठी मुस्लिम मुलाने केले धर्मांतर, लग्नानंतर मुलीची घटस्फोटाची मागणी! - Conversion of Muslim boy to marry Hindu girl
राज्यात एकीकडे तथाकथीत लव्ह जिहादच्या घटना उघडकीस येत असताना आता एक अजब प्रकार समोर आला आहे. एका मुस्लिम मुलाने हिंदू मुलीशी लग्न करण्यासाठी धर्मांतर केले, मात्र लग्नानंतर काही दिवसांतच त्या मुलीने त्याच्याशी घटस्फोटाची मागणी केली आहे.
'मतपरिवर्तन झाल्याने घटस्फोट हवा' : मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची हेबियस कॉर्पस अंतर्गत दखल घेतली. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने मुलीला 20 जून रोजी सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. आज त्यावर सुनावणी झाली. यावेळी मुलीने तिचे मतपरिवर्तन झाले असून आता तिला घटस्फोट हवा असल्याचे न्यायालयात स्पष्ट केले. मुलीने स्वच्छेने असे म्हटल्याने तिला घटस्फोट घेण्यापासून न्यायालय रोखू शकत नाही. 26 फेब्रुवारी 2022 रोजी या दोघांचे लग्न झालं होतं. लग्न झाल्यानंतर मुलाने त्याचे नाव बदलून साहिल चौधरी असे केले होते. त्यासाठीची संपूर्ण सरकारी प्रक्रिया कायद्यानुसार पूर्ण करण्यात आली होती.
मुलीच्या आई - वडिलांची मुलाला नोटीस : मुलगी ममता हिच्यामार्फत तिच्या आई - वडिलांनी राजस्थानमधून मुलाला नोटीस पाठवली आहे. या नोटिशीत त्यांनी मुलावर आरोप केला आहे की, 'त्याने मुलीशी खोटे बोलून फूस लावून हे लग्न केलं आहे. एक हिंदू महिला दुसऱ्या धर्माच्या मुलासोबत विवाह करू शकत नाही.' मुलीच्या पालकांनी महापालिकेच्या विवाह नोंदणी प्रमाणपत्राला नोटीस दिली आहे. परंतु पोलिसांत याबाबत अद्याप कोणताही गुन्हा नोंदवण्यात आलेला नसल्याची माहिती वकील शहादाफ फोफेकर यांनी दिली आहे.
हे ही वाचा :