महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अंधेरीतील नाराज भाजप नगरसेवकाची बंडखोरी - शिवसेना-भाजप-रासप महायुती

अंधेरी पूर्व मतदारसंघातून शिवसेना-भाजप-रासप महायुतीचे उमेदवार रमेश लटके यांच्याविरोधात आज जोरदार शक्तीप्रदर्शन करत मुरली पटेल यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वॉर्ड क्रमांक 81 चे मुरली पटेल हे भाजपचे नगरसेवक आहेत.

अंधेरीतील नाराज भाजप नगरसेवकाची बंडखोरी

By

Published : Oct 3, 2019, 7:48 PM IST

मुंबई- अंधेरी पूर्वचे भाजपचे नगरसेवक मुरली पटेल यांनी बंडखोरी करत आज अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे. भाजपने उमेदवारी डावल्याने त्यांनी अपक्ष लढण्याचे ठरवले आहे. 'गेल्या 20 वर्षांपासून मी केलेली कामेच मला विजय मिळवून देईल,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अंधेरीतील नाराज भाजप नगरसेवकाची बंडखोरी

हेही वाचा-जोरदार शक्तीप्रदर्शन करत आदित्य ठाकरेंचा उमेदवारी अर्ज दाखल, ठाकरे कुटुंबीय उपस्थित

अंधेरी पूर्व मतदारसंघातून शिवसेना-भाजप-रासप महायुतीचे उमेदवार रमेश लटके यांच्याविरोधात आज जोरदार शक्तीप्रदर्शन करत मुरली पटेल यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वॉर्ड क्रमांक 81 चे मुरली पटेल हे भाजपचे नगरसेवक आहेत. युतीत अंधेरी पूर्व जागा शिवसेनेच्या वाटेला आल्याने येथे पुन्हा एकदा शिवसेनेचे विद्यमान आमदार रमेश लटके यांना उमेदवारी मिळाल्याने मुरली पटेल यांना उमेदवारी मिळाली नाही. 'गेल्या 20 वर्षांपासून मी केलेली कामेच मला विजय मिळवून देईल. जनतेने मला अपक्ष उमेदवार म्हणून उभं राहण्यास सांगितले आहे. माझं भारतीय जनता पक्षासोबत कोणतीही नाराजी नसल्याचे' पटेल यांनी स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details