मुंबई:येस बँकेचे माजी अध्यक्ष राणा कपूर यांच्या विरुद्ध ईडीच्या आरोपपत्रात म्हटले आहे की, मुरली देवरा यांनी प्रियांका गांधी वाड्रा यांच्याकडून एमएफ हुसेन पेंटिंग 2 कोटी रुपयांना खरेदी करण्यास भाग पाडले. त्यामुळे त्यांना पद्मभूषण मिळण्यास मदत होईल, असे त्यांना सांगण्यात आले होते. या पेंटिंगसाठी त्यांनी चेकद्वारे दिलेले 2 कोटी रुपये सोनिया गांधी यांच्या उपचारासाठी न्यूयॉर्कमधे वापरण्यात आले. देवरा यांनी त्यांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, असेही आरोपपत्रात नमूद केले आहे.
कपूर यांनी ईडीला सांगितले की त्यांना तत्कालीन पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी सांगितले होते की एम एफ हुसेन पेंटिंग विकत घेण्यास नकार दिल्याने त्यांचे गांधी कुटुंबा सोबतचे संबंध चांगले राहणार नाहीत तसेच त्यांना 'पद्मभूषण' पुरस्कार मिळण्यापासून रोखले जाईल. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात येस बँकेचे माजी अध्यक्ष त्यांचे कुटुंब, दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (DHFL) चे प्रवर्तक कपिल आणि धीरज वाधवन आणि इतरांविरुद्ध येथील विशेष न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या दुसऱ्या पुरवणी आरोपपत्रात या जवाबाचा समावेश आहे.