महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

BJPs Murji Patel : पुढे जाऊन ऋतुजा लटकेंची तृप्ती सावंत करू नये - मुरजी पटेल - should not done to Rituja Latke

शिवसेनेचे आमदार रमेश लटके ( Shiv Sena MLA Ramesh Latke ) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ( Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray group ) उमेदवार ऋतुजा लटके ( Candidate Rituja Latke ) यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.

BJPs Murji Patel
भाजपचे मुरजी पटेल

By

Published : Nov 3, 2022, 1:51 PM IST

Updated : Nov 3, 2022, 2:49 PM IST

मुंबई :शिवसेनेचे आमदार रमेश लटके ( Shiv Sena MLA Ramesh Latke ) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Andheri East Assembly ByElection ) आज मतदान होत आहे. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ( Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray group ) उमेदवार ऋतुजा लटके ( Candidate Rituja Latke ) यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. या मतदानात मतदारांचा निरुत्साह दिसून येत असून भाजप नेते मुरजी पटेल ( BJPs Murji Patel ) यांनी सुद्धा आज सपत्नी मतदानाचा हक्क बजावला. भाजपचे मुरजी पटेल यांनी या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक एकतर्फी होत असली तरीसुद्धा मतदारांमध्ये निरुत्साह दिसून येत आहे.

मुरजी पटेल

मुरजी पटेल यांनी केले आवाहन : मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे असे आवाहन मुरजी पटेल यांनी केले असून विरोधकांकडून नोटांचे बटन दाबण्यात यावे असा प्रचार केला जात असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी मंत्री व नेते अनिल परब यांनी केला आहे. यावर भाष्य करताना मुरजी पटेल यांनी सांगितले आहे की, मी मतदारांना आवाहन केले आहे की त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावे. तसेच शिवसेनेने वांद्रे पूर्व येथील पोट निवडणुकीत बाळा सावंत यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी दिली होती. परंतु त्यानंतर पुन्हा २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत तृप्ती सावंत या भाजपच्या वाटेवर गेल्या. या गोष्टीची आठवण करून देत शिवसेनेने जे तृप्ती सावंत यांच्या बाबतीत केले ते ऋतुजा लटके यांच्याबाबत करू नये, असे आवाहन मुरजी पटेल यांनी केले आहे. मुरजी पटेल यांच्याशी खास बातचीत केली आहे.

लटके यांच्या विरोधात 6 उमेदवार मैदानात : रुतुजा यांच्या विरोधात सहा उमेदवार असून त्यापैकी चार अपक्ष आहेत. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी येथून उमेदवारी दिली आहे.

Last Updated : Nov 3, 2022, 2:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details