मुंबई - मंगळवारी 8 जून रोजी, एका अज्ञात व्यक्तीकडून शब्बीर आलमा मोउद्दीन शेख या 28 वर्षीय तरुणाला मारहाण करण्यात आली होती. एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या, धनराज मिल कंपाऊंड या ठिकाणीं शाह अँड नाहर इंडस्ट्रियल प्रिमायसेस मध्ये ही घटना घडली. मारहानी दरम्यान या युवकास इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून, फायर पॅसेजमधून खाली ढकलून त्याचा खून करण्यात आला आहे. अशी माहिती समोर येत आहे. यासंदर्भात पोलिसांनी कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्हातील अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे. यासंदर्भात एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यांमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून ढकलून युवकाचा खून - मुंबईत 28 वर्षीय तरुणाचा खून
मुंबई येथे 28 वर्षीय तरुणाला मारहाण करण्यात आली होती. या युवकास इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून, फायर पॅसेजमधून खाली ढकलून त्याचा खून करण्यात आला आहे.
![इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून ढकलून युवकाचा खून मुंबई युवकाचा खून](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12079742-657-12079742-1623302338764.jpg)
मुंबई युवकाचा खून