मुंबई- मुलुंड येथील आरआरटी रोडवर असलेल्या त्रिवेदी भवन येथे तिसऱ्या मजल्यावर एकट्याच राहणाऱ्या रुक्षमणी विसरी या 67 वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या हत्येचे गूढ अखेर उलगडले आहे. चोरी करण्याच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोराने महिलेला जाग आल्याने पकडले जाऊ, या भीतीने तिची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी कृष्णगिरी निमगिरीला अटक केली आहे.
महिलेच्या हत्येचे गुढ उलगडले हेही वाचा -लवकरच शिवसेनेची यादी जाहीर होईल - संजय राऊत
रुक्षमणी यांची 8 सप्टेंबरला त्यांच्या रहात्या घरी हत्या झाली होती. परंतु, त्या एकट्या राहात असल्याने त्यांची हत्या नेमकी कोणी केली, या बाबत पोलिसांना शोध घेणे कठीण जात होते. या हत्येमुळे परिसरातील जेष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मुलुंड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध लावला आहे. कृष्णगिरी हा अट्टल घरफोडी करणारा चोर असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अखिलेश कुमार सिंग यांनी दिली आहे.
हेही वाचा - महायुतीची घोषणा : फॉर्म्युला मात्र गुलदस्त्यात, फॉर्म वाटप सुरू