नवी मुंबई -दारू पिण्याच्या वादातून तीन मित्रांनी त्यांच्याच मित्राचा खून केल्याची घटना तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. नितेश दुबेदी (१५) असे मृत मुलाचे नाव असून तो व्यसनाधीन होता. त्याला दारु, चरस, भांग पिण्याचे व्यसन असल्याने मित्रांच्यासोबत कळंबोली परिसरात तो चोरी करून त्या पैशात व्यसन करत होता.
कळंबोली परिसरात आढळून आला होता अल्पवयीन मुलाचा मृतदेह
कळंबोली परिसरात 23 जुलैला एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळून आला होता. त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता तो मृतदेह नितेश सुनील दुबेदी (१५, खारघर) येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलाचा असल्याची माहिती मिळाली. मृत मुलाचे कुटुबीय पूर्वी कळंबोली येथे राहत होते. ते दोन महिन्यांपूर्वी खारघर येथे राहण्यास गेले होते. मृत नितेश याला व्यसन होते. आपल्या व्यसनांची गरज भागविण्यासाठी संबंधित अल्पवयीन तरूण मित्रांच्या मदतीने कळंबोली परिसरात छोट्या-मोठ्या चोऱ्या देखील करत होता.
दारूचा वाद