महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दादर मंडईमध्ये पायाने धुतले जाते गाजर; व्हिडिओ व्हायरल होताच पालिकेची कारवाई - दादर मंडई

काही महिन्यापूर्वी कुर्ला रेल्वे स्थानकात एक सरबत विक्रेता सरबतमध्ये हात पाय धूत असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर त्या स्टॉल विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असतानाच दादर येथील पालिकेच्या क्रांतीसिंह पाटील मंडईमधील पायाने गाजर धुतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

दादर मंडईमध्ये पायाने गाजर धुणाऱ्यांवर पालिकेची कारवाई

By

Published : Aug 14, 2019, 10:21 PM IST

मुंबई - दादर येथील पालिकेच्या मंडईमधील गाजर विक्रेते पायाने गाजर धूत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याची गंभीर दखल पालिकेच्या बाजार विभागाने घेतली आहे. विक्रेत्यांकडून २० ड्रम पालिकेने जप्त केले आहेत. तसेच या प्रकरणी अकरा गाळेधारकांना नोटीस बजावून प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

दादर मंडईमध्ये पायाने गाजर धुणाऱ्यांवर पालिकेची कारवाई
काही महिन्यापूर्वी कुर्ला रेल्वे स्थानकात एक सरबत विक्रेता सरबतमध्ये हात धूत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर त्या स्टॉल विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असतानाच दादर येथील पालिकेच्या क्रांतीसिंह पाटील मंडईमधील एक व्हिडिओ समोर आला आहे. यात एक व्यक्ती ड्रममध्ये गाजर धुताना दिसत आहे. त्याला एक व्यक्ती गाजर हाताने धुण्यास सांगत आहे. त्यावर आपण किती गाजर हाताने धुवायची. तुम्ही माती लागलेले गाजर खाणार का? असा उलट प्रश्न गाजर धुणाऱ्याने विचारला होता.
हा व्हिडिओ ईदच्या दिवशीचा असल्याने त्या दिवशी पालिकेचे अधिकारी विशेष कामासाठी नेमण्यात आले होते. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी (१३ ऑगस्टला) पालिकेच्या बाजार विभागाचे अधिकाऱ्यांनी मंडईत जाऊन गाळा क्रमांक ८९, ८७, ८१, ८३ यांना नोटीस बजावली. तसेच अस्वच्छता पसरवल्याबाबत प्रत्येकी एक हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. तर १४ ऑगस्ट रोजी पुन्हा याच ठिकाणी जाऊन ४७, ६०, ५५, ६६, १२९, १७३, १८६ या सात गाळेधारकांकडून अस्वच्छता पसरवल्याबाबत प्रत्येकी एक हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details