मुंबई- कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला सध्या किमान पाच दिवस क्वारंटाईन करण्यात येते. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या नायगाव प्रसूतिगृहात भलताच प्रकार उघडकीस आला आहे. या प्रसूतिगृहातील कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करून २४ तास उलटण्यापूर्वीच कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण न करताच हजर राहिल्याने त्या आणि इतरही कर्मचाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. हे कर्मचारी कोरोनाचे वाहक ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.
मुंबई महानगरपालिका कर्मचारी फक्त २४ तास क्वारंटाईन; तातडीने कामावर येण्याचा फतवा - मुंबई कोरोना न्यूज
प्रत्यक्षात संपर्कात आलेल्या चार कर्मचाऱ्यांना 7 दिवस तर अन्य कर्मचाऱ्यांना 5 दिवस क्वारंटाइन करण्याचे आदेश 3 मे रोजी देण्यात आले. परंतु, या आदेशाला 24 तास उलटत नाही तोच कर्मचाऱ्यांना पुन्हा तातडीने ड्यूटीवर हजर राहण्याचे आदेश प्रसूतिगृहाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कविता साळवे यांनी दिले.
पालिकेचे नायगाव प्रसूतीगृहात 30 एप्रिलला एका महिलेची सुखरूप प्रसूती करण्यात आली. यानंतर या महिलेची कोरोना चाचणी करण्यात आली. तिचा अहवाल 3 मे ला पॉझिटीव्ह आला होता. महिलेच्या प्रसूतीदरम्यान प्रसूतिगृहातील 21 कर्मचारी संपर्कात आले होते. यापैकी वरिष्ठ डॉक्टर, 1 परिचारिका, 1आया, 1 सफाई कामगार हे तिची प्रसूती करताना तिच्या थेट संपर्कात आले होते. अन्य 18 कर्मचारी या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आल्याचे समोर आले होते. त्यामुळे प्रत्यक्षात संपर्कात आलेल्या चार कर्मचाऱ्यांना 7 दिवस तर अन्य कर्मचाऱ्यांना 5 दिवस क्वारंटाइन करण्याचे आदेश 3 मे रोजी देण्यात आले. परंतु, या आदेशाला 24 तास उलटत नाही तोच कर्मचाऱ्यांना पुन्हा तातडीने ड्यूटीवर हजर राहण्याचे आदेश प्रसूतिगृहाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कविता साळवे यांनी दिले.
नायगाव प्रसूतीगृहात नायर हॉस्पिटलमधून नऊ कोरोनाबाधित गर्भवती दाखल होणार असल्याचे तातडीने कामावर हजर राहण्याचे आदेश साळवे यांनी दिले. प्रशासनाच्या आदेशानंतर कर्मचारी कामावर हजर झाले, परंतु आरोग्य विभाग आमच्या जीवशी खेळत असल्याची भीती कर्मचाऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.